Monday, August 4, 2025
HomeमनोरंजनKareena Kapoor Birthday: अस्सल सौंदर्याची खान आहे करीना कपूर, जगते आलिशान जीवन

Kareena Kapoor Birthday: अस्सल सौंदर्याची खान आहे करीना कपूर, जगते आलिशान जीवन

बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आज 21 सप्टेंबर रोजी आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी करीना कपूर बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणली जाते. मात्र, मुलगा तैमूर अली खानच्या जन्मानंतर तिचे पडद्यावर दिसणे कमी झाले आहे. असे असले तरी तिच्या आलिशान जीवनशैलीमुळे (Kareena Kapoor Lifestyle) ती कायम चर्चेत राहते.

कोट्यावधींची आहे संपत्ती

करीना कपूरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करतात आणि यामुळेच तिने चित्रपटांच्या बळावर कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करीना कपूर वार्षिक 73 कोटी रुपये कमावते. ती मुंबईत तिचा पती सैफ अली खानच्या घरी राहते पण तिची स्वतःची अनेक घरे आहेत. तिचे वांद्रे येथील फॉर्च्यून हाइट्स येथे 4BHK अपार्टमेंट आहे.

महागड्या गाड्यांचे कलेक्शन

करीन कपूरला महागड्या गाड्यांचा शौक आहे. तिच्याकडे 1.40 कोटी रुपयांची मर्सिडीज बेंझ एस क्लास तसेच 93 लाख रुपयांची ऑडी क्यू 7 कार आहे. यासह करिनाकडे रेंज रोव्हर स्पोर्ट एसयूव्ही आणि लेक्सस एलएक्स 470 आहे ज्याची किंमत 2.32 कोटी रुपये आहे. इतरही महागड्या गाड्यांचे कलेक्शन तिच्याकडे आहे.

2000 साली बॉलिवूडमध्ये डेब्यू

21 सप्टेंबर 1980 रोजी जन्मलेल्या करीनाने 2000 साली ‘रिफ्युजी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. करीना कपूरने आपल्या आतापर्यंतच्या बॉलिवूड प्रवासात अनेक दर्जेदार चित्रपटात काम करत आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

वयाच्या 42 व्या वर्षीही सौंदर्याला तोड नाही

करीना कपूर ही वयाला मागे टाकणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती 42 वर्षांची झाली असली तरी आजही तिच्या सौंदर्याला तोड नाही. सोशल मीडियावर एक पेक्षा एक फोटो शेअर करता ती चाहत्यांना घायाळ करत असते.

सैफ अली खानशी लग्न

करिनाने 2012 मध्ये बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सोबत लग्न केलं आहे. दोघांना एका गोंडस बाळ असून त्याचं नाव तैमूर आहे. करीना कपूर तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात यशस्वी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -