Sunday, July 27, 2025
Homeक्रीडारॉजर बिन्नी बनले BCCI चे नवे अध्यक्ष, सौरव गांगुलीला निरोप

रॉजर बिन्नी बनले BCCI चे नवे अध्यक्ष, सौरव गांगुलीला निरोप

सन 1983 मध्ये विश्वचषक विजेता भारतीय संघाचे सदस्य राहिलेले रॉजर बिन्नी (Roger Binny) आता नव्या भूमिकेत दिसणार आहेत. रॉजर बिन्नी यांची BCCI च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रॉजर बिन्नी आता सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) जागा घेणार आहेत. मंगळवारी (18 ऑक्टोबर) बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण (AGM) बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला.

रॉजर बिन्नी यांची बिनविरोध निवड
रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष बनले आहेत. रॉजर बिन्नी हे अध्यक्षपदासाठी एकमेव उमेदवार होते. त्यामुळे AGM च्या बैठकीत रॉजर बिन्नी यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. याआधी माजी कर्णधार सौरव गांगुली याची सन 2019 मध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, सौरव गांगुली यांचा कार्यकाळ वाढवला जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती. परंतु, काही दिवसांमध्ये समीकरण बदलल्याने सौरव गांगुली यांना निरोप देण्यावर शिक्का मोर्तब झाला.

रॉजर बिन्नी हे कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहे. मात्र, बीसीसीआयच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर आता रॉजर बिन्नी यांना कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अध्यध्यपदाचा राजीनामा द्यावा लागेल.

रॉजर बिन्नी हे त्यांच्या काळात मीडिअम पेस बॉलर होते. त्यांनी 1983च्या विश्वचषकात 8 सामने खेळले होते. त्यात बिन्नी यांनी 18 विकेट घेतले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -