Thursday, July 3, 2025
Homeसांगलीमिरजेत लक्ष्मीमार्केट परिसरात चार ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याचा डल्ला

मिरजेत लक्ष्मीमार्केट परिसरात चार ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याचा डल्ला


पिशवीत ठेवलेले दागिने चोरट्याकडून लंपास

दिवाळी खरेदीसाठी मिरज मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने चार ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे, अंजली सदाशिव पवार वय 50 राहणार अमन नगर मिरज ह्या दिवाळी सणाच्या निमित्ताने सराफी दुकानातून सोन्याचे दागिने खरेदी करून लक्ष्मी मार्केट येथे पटवेगार कारागीर यांच्याकडे दागिना गाठवून त्यांच्या जवळ असलेल्या पिशवीत ठेवले मार्केट मध्ये बाजार खरेदी करण्यासाठी दुकानात गेल्या असता पिशवीतील गाठवलेला दागिना पिशिवीतून गायब झाल्याचे लक्ष्यात आल्यावर शोधाशोध केली परंतु चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर मिरज शहर पोलिसांत अंजली पवार यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात तक्रार दिली आहे सुमारे 15 ते 17 हजाराच्या किमतीच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला आहे याबाबत अज्ञात चोरट्याच्यावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत मिरज शहर पोलिस अधिक तपास करत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -