Monday, December 23, 2024
Homeतंत्रज्ञानआधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी, मृत्यूनंतर आधार कार्डचा गैरवापर झाल्यास..

आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी, मृत्यूनंतर आधार कार्डचा गैरवापर झाल्यास..

देशात जवळपास 1,352,397,107 नागरिकांनी आजपर्यंत आधार कार्ड नोंदणी केली असून आता आधार कार्ड हे जवळपास ओळखपत्र म्हणूनच वापरण्यात येत आहे. या आधार कार्डाने देशातील नागरिक अनेक सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो यामुळे आधार कार्ड बाबत UIDAI सतत महत्त्वाची माहीती देत असते.

सध्या नवजात बाळाचं देखील आधार कार्ड काढण्यासाठी UIDAI कडून प्रयत्न केले जातात. आपणही आपल्या गावात, शहरात आधार सेवा केंद्रात जाऊन आधार कार्ड बनवले असेल किंवा अपडेट केले असेल. हे आधार कार्ड आपल्याकडे काही दिवसांपासून किंवा वर्षांपासून असेल तर त्याचे पुढे काय होईल, हा कदाचित निरुत्तर प्रश्न असेल, चला तर मग जाणून घेऊ.

जर आधार कार्डधारक एखाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या आधार क्रमांकाचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून युआयडीएआयने महत्वाची माहीती दिली आहेत.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) आता जन्म ते मृत्यूपर्यंतचा डेटा आधारशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

आता नवजात बालकांना तात्पुरता आधार क्रमांक दिल्यानंतर तो बायोमेट्रिक डेटासह नंतर अपग्रेड केला जाऊ शकेल.

आता प्रत्येक व्यक्तीचा आधार डेटा हा डेटाबेसमध्ये जोडला जाणार असल्याचे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडून सांगण्यात आले आहे.

देशातील मृत्यू झालेल्या नागरिकाची नोंदही आधारशी जोडली जाणार आहे. त्यामुळे आधार कार्डधारक अशी व्यक्ती मृत आहे असे दिसल्यास त्याच्या आधार क्रमांकांचा होणारा गैरवापर रोखता येईल.

सरकारी योजनांचा लाभ मिळण्याची खात्री जास्त वाढेल. मृत्यू डेटा आधारशी जोडल्याने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) योजनेचा गैरवापर होणे टाळता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -