मंगळवारी 8 नोव्हेंबरला संपूर्ण चंद्रग्रहण होणार आहे. ग्रहण भारतातील सर्व ठिकाणांहून (Lunar Eclipse Timing in India) दिसणार आहे. परंतु ग्रहणाच्या आंशिक आणि पूर्ण टप्प्याची सुरुवात भारतातील कोणत्याही ठिकाणाहून दिसणार (Chandra Grahan in India) नाही. कारण ही घटना भारतात चंद्रोदय होण्यापूर्वीच सुरु झालेली असेल. हे या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Lunar eclipse 2022 date and time) असेल. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार (Chandra Grahan 2022 Date and time) ग्रहणाच्या पूर्ण आणि आंशिक दोन्ही टप्प्यांचा शेवट (Chandra Grahan 2022 Sutak kal) देशाच्या पूर्वेकडील भागातून दिसेल. उर्वरित देशातून केवळ आंशिक टप्प्याचा शेवट दिसेल. भारताव्यतिरिक्त दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, उत्तर अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर या प्रदेशातही चंद्रग्रहण दिसणार आहे.
हे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार 2.39 मिनिटांनी सुरू होईल. याचा पूर्ण टप्पा 3.46 मिनिटांनी सुरू होईल 5.12 मिनिटांनी संपेल. तसेच चंद्रग्रहणाचा आंशिक टप्पा 6.19 मिनिटांनी संपेल. भारतात या पुढील चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर 2023 रोजी होईल आणि ते आंशिक चंद्रग्रहण असेल. याआधी 19 नोव्हेंबर 2021 रोजी भारतात चंद्रग्रहण झाले होते आणि तेही आंशिक चंद्रग्रहण होते.
देशाच्या पूर्वेकडील कोलकाता आणि गुवाहाटी शहरात चंद्रोदयाच्या वेळी ग्रहणाचा पूर्ण टप्पा सुरू होणार आहे. कोलकातामध्ये चंद्रोदयाच्या वेळेपासून पूर्ण टप्पा संपेपर्यंतचा कालावधी 20 मिनिटांचा असेल आणि चंद्रोदयाच्या वेळेपासून ग्रहणाचा आंशिक टप्पा संपेपर्यंतचा कालावधी 1 तास 27 मिनिटांचा असेल. गुवाहाटीमध्ये, चंद्रोदयाच्या वेळेपासून पूर्ण टप्प्याच्या समाप्तीपर्यंतचा कालावधी 38 मिनिटांचा असेल, तर तेथे चंद्रोदयाच्या वेळेपासून ग्रहणाचा आंशिक टप्पा संपेपर्यंतचा कालावधी 1 तास 45 मिनिटांचा असेल.
दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बंगळुरूसह देशातील इतर शहरांमध्ये चंद्रग्रहणाचा पूर्ण टप्पा संपल्यानंतर चंद्रोदय होईल. त्यामुळे या ठिकाणांहून फक्त अंशिक चंद्रग्रहण दिसेल. या ठिकाणांहून चंद्रोदयाच्या वेळेपासून चंद्रग्रहण संपेपर्यंत पाहता येईल. या शहरांमध्ये ग्रहणाचा आंशिक टप्पा अनुक्रमे 50 मिनिटे, 18 मिनिटे, 40 मिनिटे आणि 29 मिनिटांचा असेल.
चंद्रग्रहण पौर्णिमेला होत असते. आकाशात जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि तिन्ही ग्रह एका सरळ रेषेत असतात तेव्हा चंद्रग्रहण होते. तसेच जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीने झाकला जातो तेव्हा संपूर्ण चंद्रग्रहण होते. याचप्रमाणे चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या सावलीने झाकलेला असतो तेव्हा आंशिक ते चंद्रग्रहण असते.