ताजी बातमी ऑनलाईन टीम
अभिनेता अक्षय कुमार सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची मुख्य भूमिका असलेला ‘हेरा फेरी’ हा विनोदी सिनेमा हिट ठरला होता. यानंतर ‘फिर हेरा फेरी’ हा सिनेमाही चांगलाच गाजलाय. या सिनेमातील गाणि आणि विशेषत: परेश रावल यांनी साकारलेली बाबूरावची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. याशिवाय अक्षय कुमारने साकारलेला राजू आणि सुनील शेट्टी याने साकारलेली शामची भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही कायम आहे. या चित्रपटातील अनेक डायलॉगही चांगलेच गाजले.
याशिवाय ‘फिर हेरा फेरी’ सिनेमातील अभिनेत्री, रायमा सेन, बिपाशा बासू यांचा अभिनयही प्रेक्षकांना आवडला. पण याचबरोबर या सिनेमातील आणखी एक कलाकार प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. या सिनेमात एका लहान मुलीने बालकलाकार म्हणून काम केलं, सिनेमात मजेदार अंदाजात ती ‘कुकुडूकू’ बोलताना दाखवली आहे.
एंजलिना दिसते ग्लॅमरस
हेरा फेरी सिनेमात या मुलीचं काही गुंड अपहरण करतात, त्यांना चकवा देत ती मुलगी त्यांच्या तावडीतून सुटते. त्यानंतर तिची गाठ अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्याशी पडते. त्या मुलीला खूप भूक लागलेली असते आणि ती या तिघांकडे खायला केळी मागते. तिच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव पाहून हे तिघेही तिला खायला देतात. हा सीन चांगलाच गाजला होता. त्यावेळी आठ-नऊ वर्षांची असलेल्या या मुलीचं नाव आहे एंजलिना इदनानी एंजलिना इदनानी आता मोठी झाली असून ती खूपच सुंदर दिसते.