Friday, August 1, 2025
Homeमनोरंजन'रंग माझा वेगळा' मालिकेत जेनेलियाची होणार स्पेशल एन्ट्री

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत जेनेलियाची होणार स्पेशल एन्ट्री

स्टार प्रवाह वाहिनीवरील अनेक मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. यातीलच एक सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘रंग माझा वेगळा’. मालिकेत येणारे ट्विस्ट आणि टर्न प्रेक्षकांना कायमच खिळवून ठेवत आले आहेत. दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता आणखीनच वाढत चालली आहे. रंग माझा वेगळा ही मालिका नेहमीच चर्चेत असते. याशिवाय मालिकेतील कलाकारही कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. अशातच मालिकेत आणखी नवा ट्विस्ट येणार असून अभिनेत्री जेनेलिया डिसूजा ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत एन्ट्री घेणार आहे.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या आगामी भागाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओवरुन दिसतंय की मालिकेच्या आगामी भागात जेनेलिया डिसूजा एन्ट्री घेणार आहे. याचा व्हिडीओ टीआरपी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनंध्ये लिहिलंय, वेड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रंग माझा वेगळा मालिकेत स्पेशल एन्ट्री करणार “जेनीलिया डिसूज़ा”.

हा सगळा अट्ट्टाहास जेनेलिया आणि रितेश यांच्या येणाऱ्या आगामी चित्रपट ‘वेड’ साठी आहे.

जेनेलिया ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत येणार म्हटल्यावर तिचे चाहते आणि मालिकेचा प्रेक्षकवर्ग सगळेच उत्सुक आहेत. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये जेनेलिया कार्तिकसोबत बोलत आहे. त्यामुळे ती कार्तिकला काय सल्ला देणार किंवा तिच्या येण्यामुळे मालिकेत काय नवा ट्विस्ट येणार हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत सध्या आयशाची एन्ट्री झाली आहे. कार्तिकला मिळवण्यासाठी आयशाने आपण त्याच्या बाळाची आई होणार असल्याचं खोटं सांगितलं आहे. मात्र दीपाने आयशाला चॅलेज दिलंय की ती कार्तिक समोर सगळं खरं आणणार. त्यामुळे आता दीपा तिच्या मुलींच्या भविष्यासाठी आयशाला दिलेल्या चॅलेंजवर खरी उतरणार का?

यासाठी तिला काय काय करावं लगाणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान, अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजा यांचा ‘वेड’ चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा अपूर्ण राहिलेल्या प्रेमाभोवती फिरते. या चित्रपटाच्या टीझरलाही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -