ताजी बातमी ऑनलाइन टीम
नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या आणि बँकेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत 54 स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते एसबीआयची अधिकृत वेबसाईट sbi.co.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीन अर्ज करु शकतात.
एसीबीआयने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 9 डिसेंबरपासून सुरु झाली आहे. तर 29 डिसेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. 29 डिसेंबरनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या भरती प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूवी उमेदवारांनी पगार, रिक्त जागा तपशील, पात्रता निकष, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशील जाणून घेणे गरजेचे आहे.
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख – 9 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 29 डिसेंबर 2022
पदांचा तपशील –
एकूण पदं – 54 पदं
– डेप्युटी मॅनेजर – 16 पदं
– सिनिअर एग्झिक्युटिव्ह – 17 पदं
– एग्झिक्युटिव्ह – 2 पदं
– सिनिअर स्पेशल एग्झिक्युटिव्ह – 1 पदं
– डाटा प्रोटेक्शन ऑफिसर – 1 पदं
– असिस्टंट डेटा ऑफिसर – 1 पदं
– सिनिअर क्रेडिट स्पेशालिस्ट – 16 पदं
SBI Recruitment 2022 : अर्ज फी –
स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या पदांसाठी अर्ज करणार्या सामान्य/EWS/OBC श्रेणीतील अर्जदारांना 750 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/PWD श्रेणीतील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
पगार –
– डेप्युटी मॅनेजर – 60 लाख रुपये (CTC)
– सिनिअर एग्झिक्युटिव्ह – 24 लाख रुपये (CTC)
– एग्झिक्युटिव्ह – 20 लाख रुपये (CTC)
– सिनिअर स्पेशल एग्झिक्युटिव्ह – 27 लाख रुपये (CTC)
असा करा अर्ज –
एसबीआय स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वात आधी sbi.co.in/web/careers येथे SBI च्या करिअर पेजला भेट देणे आवश्यक आहे.
– त्यानंतर होमपेजवर ‘RECRUITMENT OF SPECIALIST CADRE OFFICERS’ या पोस्टवर क्लिक करा.
– आता अप्लाय ऑनलाइन यावर क्लिक करा.
– आता नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रियेसह पुढे जा.
– आता फॉर्म भरा, कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.
– त्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.