ताजी बातमी ऑनलाईन टीम
कवलापूर मधील श्री सिद्धेश्वर पाणी पुरवठा संस्थेचे संचालक म्हणून बिनविरोध निवडून देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून संस्थेच्या पाणीपुरवठ्याची पाईप फोडून २० हजारांचे नुकसान केल्याची घटना घडली.
सदरचा प्रकार हा कवलापूर मधील एका शेतजमिनीत गुरुवार दि. ५ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडला. या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष निवास पांडुरंग पाटील (वय ६० रा. कवलापूर) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नुकसान करणाऱ्या प्रमोद लक्ष्मण पाटील (वय ४० रा. कवलापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तोडफोडीत संस्थेचे सुमारे १५ ते २० हजारांचे नुकसान झाले आहे.
सांगली ; संचालक केले नाही म्हणून तोडफोड
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -