Friday, August 1, 2025
Homeसांगलीमिरजेतील घटना ; जागा ताब्यात घेण्यासाठी मध्यरात्री घरे, हॉटेल उध्वस्त ; ...

मिरजेतील घटना ; जागा ताब्यात घेण्यासाठी मध्यरात्री घरे, हॉटेल उध्वस्त ; Photo

ताजी बातमी ऑनलाइन टीम

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील जागेचा ताबा घेण्यासाठी शनिवारी मध्यरात्री दोन वाजता हॉटेल आणि घरे उध्वस्त केल्याची घटना घडली. जागा ताब्यात घेण्यासाठी पोकलँडच्या साह्याने घरे, हॉटेल उध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. रात्री दोन वाजता अचानक घरे पाडण्याचा प्रकार सुरु झाला.घरे पाडणाऱ्यांच्या हातात काठ्या, कोयते आणि तलवारी होत्या. दबाव आणून हे कृत्य केल्य़ाचे नागरिकांनी सांगितले. नेमके काय घडले जाणून घेऊया छायाचित्रणांच्या माध्यमातून…

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील जागेचा ताबा घेण्यासाठी शनिवारी मध्यरात्री दोन वाजता हॉटेल आणि घरे उध्वस्त केल्याची घटना घडली. जागा ताब्यात घेण्यासाठी पोकलँडच्या साह्याने घरे, हॉटेल उध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे.विधान परिषदेचे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर याच्यासह शंभर ते दीडशे तरुणांच्या जमावाने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी विशाल दिलीपराव सन्मुख (वय 45, रा. शिवाजी क्रिडांगणासमोर मिरज) यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशियित ब्रम्हदेव ऊर्फ ब्रम्हानंद पडळकर व शंभर ते दीडशे तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहराच्या प्रमुख चौकातील लोकवस्तीत धारदार हत्यारांसह गुंडगिरी प्रवृत्तीने घुसखोरी करून मध्यरात्री हैदोस घातल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे. घटनास्थळी भाजपाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

विशाल सन्मुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जमिन जागेचा ताबा मिळविण्यासाठी शनिवारी मध्यरात्री ब्रह्मानंद पडळकर याच्यासह शंभर ते दीडशे जणांनी घरांवर हल्ला केला. सर्वांच्या हातात काठ्या, कोयते आणि तलवारी होत्या. हा जमाव बघून आम्ही भयभीत झालो.जमावाने घरांवर दगडफेक केली. यावेळी पोकलँडच्या साह्याने घरे आणि हॉटेल उध्वस्त करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -