Friday, February 7, 2025
Homeक्रीडाआरसीबी विरुद्ध चेन्नई सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाकडे?

आरसीबी विरुद्ध चेन्नई सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाकडे?

आयपीएल 16 व्या मोसम जसाजसा पुढे सरकतोय तसातसा थरार आणि रंगत वाढत जातेय. क्रिकेट चाहत्यांना दररोज एकसेएक आणि थरारक सामने पाहायला मिळतेय. एकूण 10 संघांमध्ये सामने जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला जातोय. तसाच वैयक्तिक पातळीवर फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये ऑरेन्ज आणि पर्पल कॅप जिंकण्यासाठी आणि ती कायम राहण्यासाठी संघर्ष पाहायला मिळतोय. एका सामन्याने, एका धावेने आणि एका विकेटने ऑरेन्ज आणि पर्पल कॅपचं गणित ठरतयं. आज एकाकडे असलेली कॅप दुसऱ्या दिवशी कोणाकडे असेल, याबाबत कुणीही सांगू शकत नाही. यावरुन ही कॅप आपल्याकडे ठेवण्यासाठी किती चढाओढ आहे, याचा अंदाज बांधता येतो.

आयपीएलच्या प्रत्येक मोसमात सामन्यानुसार ज्या फलंदाजाचे सर्वाधिक धावा त्याला ऑरेन्ज कॅप देण्यात येते. तर सर्वाधिक विकेट्स असलेल्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. मोसमाअखेरीस ज्याच्या नावावर जास्त विकेट्स असतात, तो गोलंदाज आणि फलंदाज ती कॅप आपल्या नावावर करतो. मात्र मोसमादरम्यान कामगिरीनुसार कॅपची अदलाबदल होत असते.

आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 24 वा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पार पडला. चेन्नईने हा हायस्कोरिंग सामना 8 धावांनी जिंकला. चेन्नईे दिलेल्या 227 धावांचं आव्हान पार करताना आरसीबीला 8 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 218 धावाच करता आल्या. आरसीबीकडून ग्लेम मॅक्सवेल याच्या 76 धावांच्या खेळीनंतर फाफ डु प्लेसी यानेच दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक 62 धावा केल्या. फाफने या खेळीदरम्यानच कोलकाता नाईट रायडर्स टीमचा फलंदाज वेंकटेश अय्यर याच्याकडे असलेली ऑरेन्ज कॅप पटकावली. वेंकटेशने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात 104 धावांची शतकी खेळी करत ऑरेन्ज कॅप मिळवली होती.

फाफने आतापर्यंत 5 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांच्या मदतीने 20 चौकार आणि 18 सिक्स ठोकत 172.66 च्या स्ट्राईक रेटने 259 धावा केल्या आहेत. फाफची नाबाद 79* ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

पर्पल कॅप ही आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्यानंतरही राजस्थान रॉयल्स टीमचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याच्याकडे कायम आहे. युजवेंद्र चहल याने 5 सामन्यात 20 ओव्हर टाकून 7.85 च्या इकॉनॉमी रेटने 157 धावा देत 20 विकेट्स घेतल्या आहेत. चहलची 17 धावा देत 4 विकेट्स ही वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -