पॉइंट टेबलमध्ये आता रस्सीखेच पाहायला मिळणार असून यामध्ये रनरेट महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये शेवटला क्वालिफाय होण्यासाठी सामन्यांच्या निकालावर काही संघांची एन्ट्री ठरू शकते.मुंबई मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यामुळे संपूर्ण गुणतालिकेचं गणितच बदललं आहे. गुजरातने लखनऊला 7 धावांनी पराभूत केलं. तर पंजाबने मुंबईला 13 धावांनी पराभवाची धूळ चारली. यामुळे गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्सच्या खात्यात दोन गुणांची भर पडली आहे. त्यामुळे प्रत्येक संघाच्या उर्वरित सात ते आठ सामन्यात जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे. कारण हा टप्पा निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे टॉप चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी पहिल्या आठ संघांमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे.मुंबई इंडियन्सला टॉप 4 मध्ये येण्यासाठी आठ पैकी 5 सामने जिंकावे लागणार आहेत. अशीच संधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला देखील आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स, लखनऊ, चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरातने उर्वरित सामन्यांपैकी एखाद दोन सामने सोडून इतर सामने जिंकले तर मात्र मुंबई इंडियन्स आणि बंगळुरुचं काही खरं नाही.
गुणतालिकेत राजस्थानचा संघ पहिल्या स्थानी, लखनऊ दुसऱ्या, चेन्नई तिसऱ्या, गुजरात चौथ्या, पंजाब पाचव्या, बंगळुरु सहाव्या, मुंबई सातव्या, कोलकाता आठव्या, हैदराबाद नवव्या आणि दिल्ली दहाव्या स्थानी आहे.
पंजाबने पराभूत केल्यानंतर मुंबई इंडियन्सला मोठा फटका, आता टॉप 4 मध्ये येण्यासाठी जिंकावे लागणार इतके सामने
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -