सध्या आयपीएलची धूम जोरात सुरू आहे आणि याच आयपीएलवर बेंटिंग करणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत.सांगलीत अशाच पद्धतीने आयपीएल’ वर बेटींगचा खेळ करणारी एक टोळी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडली आहे. सांगलीजवळ कुपवाड परिसरामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा मारुन अटक करत त्याच्याकडून लॅपटाॅप, 9 मोबाईल, दुचाकी असा 2 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, बुकीकडून जप्त केलेल्या डायरीमध्ये बेटींग खेळणार्या 23 जणांची नावे व मोबाईल नंबरची यादी मिळाली असून त्या लोकांच्या मागावर पोलीस आहेत.
विश्वनाथ संजय खांडेकर (वय 22, रा. गंगानगर रोड, वारणाली), रतन बनसोडे (वय 27 रा. आलिशान कॉलनी, कुपवाड), गणेश मल्लाप्पा कोळी (वय 21 रा. झेडपी कॉलनी, वारणाली), संतोष सुरेश पाडगे (वय 19 रा. महावीर नगर, विश्रामबाग) या चौघांचा समावेश आहे. बुकी विश्वनाथ खांडेकरकडून जप्त केलेल्या डायरीमध्ये बेटिंग खेळणार्या 23 जणांची नावे आणि मोबाईल नंबरची यादी मिळाली आहे. यादीतील संशयितांचा शोध सुरु आहे. एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली आणि अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील (अतिरीक्त कार्यभार) यांनी टाटा आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणार्यावर कारवाईचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी सहायक निरीक्षक संदीप शिंदे आणि अंमलदारांचे एक पथक करुन कारवाईचे आदेश दिले.
जिल्ह्यात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटिंग घेणाऱ्यांची माहिती घेताना पथकातील दीपक गायकवाड, प्रशांत माळी यांना संशयित विश्वनाथ संजय खांडेकर हा कुपवाड ते वाघमोडेनगर जाणारे रस्त्यावर कृष्णा मोरे यांच्या मालकीचे शेतात शेडमध्ये लखनऊ सुपर जाएंटस् आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या संघात सुरु असलेल्या क्रिकेट सामन्यावर मोबाईलद्वारे धावांवर आणि विजय पराजय यावर बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाली. पथकाने कृष्णा मोरे यांच्या शेतात शेडमध्ये पंचासमक्ष छापा मारला. तेथे संशयित लॅपटॉप व मोबाईलच्या सहाय्याने क्रिकेट सामन्यावर बेटींग घेत होते.
चौघांना ताब्यात घेतल्यावर विश्वनाथ खांडेकरने क्रिकेट लाईव्ह गुरु नावाच्या अॅपवर आयपीएलच्या सामन्याची धावसंख्या व विजय-पराभवचा भाव पाहत लोकांकडून पैसे घेत असल्याचे सांगितले. क्रिकेट सामन्याच्या हार जीतवर भाव असेल त्याप्रमाणे वाढीव भावाने पैसे देत असल्याचेही कबुल केले. निरीक्षक सतिश शिंदे, सहायक निरीक्षक संदीप शिंदे, अंमलदार दिपक गायकवाड, प्रशांत माळी, संदिप पाटील, सुनिल चौधरी, सुधीर गोरे, अमोल ऐदाळे, राहूल जाधव, गौतम कांबळे, अजय बेंदरे, आर्यन देशींगकर, कॅप्टन गुंडवाडे, संजय कांबळे, संकेत मगदूम यांच्या पथकाने कारवाई केली.
सांगली आयपीएल वर बेटिंगचा खेळ करणारी टोळी जेरबंद नऊ मोबाईल सह तीन लाखाचा मुद्देमाल जप्त.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -