रश्मिका आणि श्रीनिवास बेल्लमकोंडा यांना अलीकडच्या काळात काही कार्यक्रमांमध्ये आणि मुंबई विमानतळावर एकत्र पाहिले गेले होते. यानंतर दोघांच्या डेटिंगच्या अफवा उडू लागल्या.
त्याचवेळी ‘छत्रपती’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या श्रीनिवासने अखेर रश्मिकाला डेट करण्याच्या अफवांवर मौन सोडले असून सत्य काय आहे ते सांगितले आहे.अलीकडील रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की रश्मिका अभिनेता विजय देवरकोंडासोबतचे तिचे कथित नाते संपुष्टात आल्यानंतर श्रीनिवास बेल्लमकोंडा याला डेट करत आहे.
रश्मिकाने अद्याप विजयसोबतच्या तिच्या कथित ब्रेकअपवर किंवा श्रीनिवाससोबतच्या कथित रिलेशनशिपवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या सगळ्या दरम्यान, बेल्लमकोंडाने पुष्टी केली आहे की तो रश्मिकाला डेट करत नाहीये.सिद्धार्थ कन्ननच्या चॅट शोमध्ये बोलताना श्रीनिवास बेल्लमकोंडा म्हणाला, “हे कसे घडले हे मला माहित नाही, मला वाटते की हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण आम्ही फक्त चांगले मित्र होतो आणि आम्ही चुकून विमानतळावर एकमेकांना भेटलो होतो. आम्ही दोघे हैदराबादचे आहोत आणि आम्ही मुंबईत येत राहतो त्यामुळे अनेकदा एकमेकांना भेटतो. पण एक-दोनदाच पापाराझींनी आम्हाला विमानतळावरून बाहेर येताना पाहिले असेल.”
रश्मिका शेवटची विजय-स्टार तामिळ चित्रपट ‘वारीसु’ मध्ये दिसली होती. तिच्याकडे संदीप रेड्डी वंगा यांचा अॅनिमल हा हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. त्याचवेळी श्रीनिवास बेल्लमकोंडा ‘छत्रपती’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही व्ही विनायक यांनी केले आहे आणि एसएस राजामौली यांचे वडील आणि ज्येष्ठ लेखक व्ही विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिले आहे. एसएस राजामौली यांच्या 2005 साली आलेल्या त्याच नावाच्या चित्रपटाचा हा अधिकृत रिमेक आहे. मूळ चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत होता.