Friday, February 7, 2025
HomeसांगलीMiraj Railway : मिरजेतलं 'हे' 25 वर्षे जुनं फाटक कायमचं होणार बंद;...

Miraj Railway : मिरजेतलं ‘हे’ 25 वर्षे जुनं फाटक कायमचं होणार बंद; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Miraj : मिरजेच्या विस्तारित भागातील समतानगर रेल्वे फाटक (Samtanagar Railway Gate) कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आल्यामुळे समतानगरसह प्रभाग दोन मधील पंधरा उपनगरांतील वीस हजारांहून अधिक नागरिकांची गैरसोय होणार आहे.या प्रभागाच्या नगरसेविका तथा माजी महापौर संगीता खोत यांनी विरोध दर्शवला आहे. समतानगर येथे रेल्वेचा मालधक्का आहे.

या ठिकाणी लोहमार्गाद्वारे परराज्यांतून येणारे धान्य एकत्रित केले जाते. पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर सातारा या ठिकाणी येथून धान्य पाठवले जाते. या मालधक्क्यांकडे आठवड्यातून दोन-एक मालगाडीचे लोड उतरवला जातो. त्याच मालधक्क्यानजीक २५ वर्षे जुने फाटक आहे.मालधक्क्याला लागून महापालिकेच्या तीन प्रभागांतील तब्बल वीस हजारांहून अधिक नागरिकांना सांगली, मिरज मार्केट व मिशन चौक येथे जाण्यासाठी हे फाटक सोयीचे आहे. मात्र कोणताही ठोस कारण नसताना रेल्वे प्रशासनाकडून समतानगर रेल्वे फाटक कायमस्वरुपी बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

त्यासाठी जिल्हा तालुका व महापालिका स्तरावर पत्रव्यवहार करण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.रेल्वे फाटक बंद केल्यामुळे समतानगर, गंगानगर, माणिकनगर, शांतिनगर, जानवडे प्लॉट, लक्ष्मीनगर, ख्वाजा वस्ती, कोल्हापूर चाळ, जयहिंद कॉलनी, तोडकर मळा, चौगुले मळा, हिंदू-मुस्लिम कॉलनी यासह उपनगरातील १५ रहिवासी वसाहतीतील तब्बल वीस हजार नागरिकांची गैरसोय होणार आहे. रेल्‍वेने अचानक निर्णय घेऊन लोकांना अडचणीत टाकले आहे.

त्‍याचा निषेध केला जात आहे.रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या पत्रामध्ये समतानगर येथील रेल्वे फाटक बंद करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. मात्र या पत्रामध्ये केव्हा सुरू करणार, याची शाश्वती नाही. विचारले असता उत्तर त्यांच्याकडे नाही. रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंदचा निर्णय झाल्याचे समजते. यामुळे तीन प्रभागातील वीस हजारांहून नागरिकांची गैरसोय होणार आहे. रेल्वे फाटक बंद करण्यास आमचा विरोध आहे. -संगीता खोत, माजी महापौर तथा नगरसेवकसमतानगर रेल्वे फाटकाची कोणतीही अडचण नसताना नागरिकांचा रस्ता अडवण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून होत आहे.

हे फाटक पंचवीस वर्षांहून अधिक जुने आहे. मात्र आताच बंद करण्याचा घाट का घातला आहे, याचे उत्तर रेल्वे प्रशासनाकडे नाही. ते कायमस्वरुपी बंदचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करू.-अमित नाईक, रहिवासी, समतानगर

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -