Friday, February 7, 2025
Homeसांगली मिरज एस.टी.स्टॅन्डवरून ३ लाखांचा ऐवज लंपास!

 मिरज एस.टी.स्टॅन्डवरून ३ लाखांचा ऐवज लंपास!

मिरज एस.टी. स्टॅन्डवरून इचलकरंजी बसमध्ये चढत असताना सौ. शकुंतला संदीप यादव (वय २९ रा. यशवंत कॉलनी मागे मणेर मळा कबनूर) यांची पर्स चोरट्यांनी लांबविली. पर्समधील रोख रक्कम व गंठण, कानातील टॉप्स, अंगठी असा एकूण अंदाजे ३ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. यादव यांनी गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सौ. शंकुतला यादव या विजापूरला गेल्या होत्या. विजापूरहून मिरजेत त्या उतरल्या होत्या. मिरजेतून इचलकरंजीला जाण्यासाठी म्हणून प्लॅटफॉर्मवर थांबल्या होत्या. इचलकरंजीकडे जाण्यासाठी एसटी आल्यानंतर त्या एस. टी. मध्ये चढत असताना त्यांच्याजवळ असलेल्या बॅगेची चेन उघडून बॅगेत ठेवलेली पर्स चोरट्यांनी लांबवली. बॅगेची चेन उघडी दिसल्यानंतर यादव यांनी पर्स तपासली असता त्यांना पर्स गायब झाल्याचे दिसले. त्यांनी लगेच खाली उतरून शोधाशोध केली परंतु चोरटा पर्स घेवून पसार झाला होता. पर्समध्ये गंठण, कर्णफुले, अंगठी तसेच रोख तीन हजार रूपये असा अंदाजे ३ लाखांचा मुद्देमाल गायब झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -