Monday, December 23, 2024
Homeक्रीडाभारत-पाकिस्तान 3 वेळा येणार आमने-सामने, एशिया कपचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

भारत-पाकिस्तान 3 वेळा येणार आमने-सामने, एशिया कपचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भारतात या वर्षाच्या अखेरीत एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्याआधी पाकिस्तानात एशिया कप स्पर्धा रंगणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेचं वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्या सामन्याच्या ठिकाणावरुन वाद सुरु होता. बीसीसीआयने टीम इंडिया (Team India) पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर पाकिस्तानाने हायब्रिड मॉडलचीऑफर केली. त्यानुसार आशिया कप स्पर्धेतले 4 सामने पाकिस्तानात तर 9 सामने श्रीलंकेत खेळवले जातील. 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाईल. श्रीलंका आशिया कप स्पर्धेची गतविजेता संघ आहे.

‘या’ तारखांना आमने सामने
एशियन क्रिकेट काऊन्सीलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार यजमान पाकिस्तान आणि नेपाळदरम्यान स्पर्धेतला सलामीचा सामना खेळवण्यात येईल. पाकिस्तानमधल्या मुलतानमध्ये हा सामना रंगेल. तर भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तानदरम्यान 2 सप्टेंबरला पहिला सामना खेळवला जाईल. हा सामना श्रीलंकेतल्या कँडीमध्ये खेळवलाज जाईल. या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. यात भारत आणि पाकिस्तानशिवाय श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ या संघांचा समावेश आहे. प्रत्येकी 3 संघ दोन ग्रुपमध्ये विभागाण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत.

दोनी ग्रुपमधील टॉपचे चार संघ सुपर-4 मध्ये पोहोचतली. सुपर-4 (Super-4) मध्ये टीम इंडियाचा 10 सप्टेंबरला बाबर आझमच्या पाकिस्ताशी सामना होऊ शकतो. भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवली जातील. भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहचेल, तर 17 सप्टेंबरला हे दोन्ही संघ आमने सामने येतील. म्हणजेच 15 दिवसात भारत-पाक तीन वेळा भिडतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -