Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगखवळलेल्या भारताची डायरेक्ट Action, मालदीवचे हाय कमिशनर परराष्ट्र मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये

खवळलेल्या भारताची डायरेक्ट Action, मालदीवचे हाय कमिशनर परराष्ट्र मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेली आक्षेपार्ह टिप्पणी मालदीवला भारी पडताना दिसतेय. आधी सोशल माडियावर मालदिववर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरु झाला. त्यानंतर भारतातील दिग्गज ट्रॅव्हल कंपनीने मालदीवमधील फ्लाईटस बुकिंग रद्द केली. आता भारत सरकारने मालदीवच्या हाय कमिशनरला बोलवून घेतलय. भारत सरकारच्या आदेशानंतर मालदीवचे हाय कमिशनर इब्राहिम साहिब भारताच्या परराष्ट्र मंत्रालय कार्यालयात दाखल झाले.

तिथे स्पष्टीकरण दिल्यानंतर तिथून रवाना झाले. मालदीवच्या महिला मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. भारताने हा मुद्दा मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारसमोर लावून धरलाय. मालेमध्ये भारताच्या उच्चायुक्ताने मंत्र्याच्या टिप्पणीवर कठोर शब्दात आक्षेप नोंदवला.भारत सरकारच्या आपत्तीनंतर मालदीव सरकारने स्टेटमेंट जारी करुन हे त्यांचं व्यक्तीगत मत असल्याच म्हटलं.

मंत्र्यांच्या मताशी मालदीव सरकार सहमत नाही, असं सांगण्यात आलं. भारत सरकारच्या नाराजीनंतर मरियम शिउनासह मालशा शरीफ आणि महजूम माजिद यांना निलंबित करण्यात आलं. या सगळ्या प्रकरणाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर झाली. पीएम मोदी यांनी लक्षद्वीप टूरनंतर फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.वादाला सुरुवात कशी झाली?

 

त्यांनी भारतीयांना लक्षद्वीप भेटीच आवाहन केलं होतं. त्यानंतर मालदीवच्या युवा सशक्तिकरण विषयाच्या मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टवर आपत्तीजनक टिप्पणी केली. या टि्वटवर मोठ्या प्रमाणात टीका झाली..मालदीवला किती भारतीय पर्यटक गेले?

 

मालदीवमध्ये पर्यटन हे रोजगाराच एक मोठ माध्यम आहे. त्या दृष्टीने मालदीव बऱ्याच बाबतीत भारतावर अवलंबून आहे. कारण भारतातून मोठ्या संख्येने पर्यटक मालदीवला जातात. 2018 मध्ये 14,84,274 पर्यटक मालदीवला गेले. त्यातले 6.1% (90,474 पेक्षा अधिक) टूरिस्ट भारतातून गेले होते. 2019 मध्ये भारतातून मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दुप्पट झाली. 2019 मध्ये 1,66,030 पर्यटक मालदीवला गेले होते. मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -