Thursday, February 6, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी मनपा व वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांची धाडसी कर्तबगारी : मजरेवाडी येथे पुराच्या...

इचलकरंजी मनपा व वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांची धाडसी कर्तबगारी : मजरेवाडी येथे पुराच्या पाण्यात जावून वीज पुरवठा केला सुरळीत

ताजी बातमी /ऑनलाईन टीम

इचलकरंजी शहरास कृष्णा नदीमधुन मजरेवाडी उपसा केंद्रातुन पाणी पुरवठा करणेत येतो. गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढल्याने सध्या कृष्णा नदीस पुर आलेला असुन सुद्धा इचलकरंजी महानगर पालिका पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी पुर परिस्थितीमध्ये शहराचा पाणी पुरवठा नियमित व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत.

   तथापि काल मजरेवाडी उपसा केंद्रास वीज पुरवठा होत असलेली

विद्युत वाहीनी तुटल्याने पाणी उपसा केंद्राचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता परिणामी उपसा बंद झाल्याने शहराचा पाणी पुरवठाही अनियमित होण्याची शक्यता असल्याने उपसा केंद्राचा विद्युत पुरवठा सुरू होणे अत्यंत आवश्यक होते.

 

सदर बाब लक्षात घेता आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी वीज पुरवठा सुरू करणेसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना पाणी पुरवठा विभागास दिलेल्या होत्या.

 

या अनुषंगाने पाणी पुरवठा अभियंता बाजी कांबळे यांनी पुराच्या पाण्यात बोटिने जावुन वीज वितरण कंपनी कुरुंदवाड ग्रामीणचे लाईनमन मनोहर भंडारे, संदीप कांबळे, सुरज माळी , राकेश नरुटे तसेच वसंत कळेकर, सर्फराज पटेल, केदार रनाविरे, संदेश सूर्यवंशी यांच्या सहाय्याने तुटलेली विद्युत वाहीनी जोडुन उपसा केंद्राचा विद्युत पुरवठा पूर्ववत केलेला आहे.

त्यामुळे मजरेवाडी उपसा केंद्रामधुन पाणी उपसा सुरू केल्याने शहराचा पाणी पुरवठा नियमित होणार आहे. अशी माहिती इचलकरंजी महानगरपालिकेचे माहिती व जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -