Wednesday, December 4, 2024
Homeतंत्रज्ञानमोबाईलमध्ये व्हायरस सक्रिय असेल तर दिसतात ‘हे’ बदल; अशाप्रकारे करा संरक्षण

मोबाईलमध्ये व्हायरस सक्रिय असेल तर दिसतात ‘हे’ बदल; अशाप्रकारे करा संरक्षण

आजकाल तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात प्रगत झालेले आहे. परंतु या वाढत्या तंत्रज्ञानाचे मानवाला जेवढे फायदे होतात, तेवढ्याच नुकसानाला देखील सामोरे जावे लागतेम आज काल अनेक स्मार्टफोनमध्ये व्हायरस असण्याचे प्रमाण वाढलेले आहेत. आपला स्मार्टफोनला जेव्हा इंटरनेट कनेक्ट असतो, तेव्हा स्मार्टफोनमध्ये विविध ॲप मधून किंवा ऑनलाईन लिंक्स मधून व्हायरसचा धोका निर्माण होत असतो. तसेच यामुळे आपली बँकिंग क्षेत्रात देखील फसवणूक होऊ शकते. त्यामुळे व्हायरसच्या संदर्भात आपण काळजी घेणे खूप गरजेचे असतेम अनेक वेळा आपल्या मोबाईलमध्ये असलेला व्हायरस आपल्याला ठाऊकही नसतो. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत. ज्याद्वारे तुमच्या फोनमध्ये व्हायरस आहे हे की नाही? हे तुम्हाला ओळखता येणार आहे.

 

स्मार्टफोनचा कमी स्पीड

अनेक वेळा जेव्हा आपण स्मार्टफोन वापरतो तेव्हा लक्षात येते की, आपल्या फोनचा स्पीड अचानक स्लो झालेला आहे. म्हणजेच आपल्या फोनची प्रोसेसिंग स्पीड अचानक कमी होते. याचे का मुख्य कारण व्हायरस असू शकते. जेव्हा आपल्या फोनचा वेग कमी होतो त्यावेळी व्हायरसने आपल्या मोबाईलवर हल्ला केलेला असतो. अशावेळी लगेच सावध होणे गरजेचे असते.

 

बॅटरी लवकर संपणे

 

अनेकवेळा आपण मोबाईल न वापरता देखील आपल्या मोबाईलची बॅटरी वेगाने कमी होत असते. जेव्हा आपण फोन वापरत नाही. त्यावेळी आपल्या मोबाईलमध्ये असलेला व्हायरस सक्रिय असतो. जो बॅकग्राऊंडमध्ये बॅटरी वापरत असतो. त्यामुळे आपल्या मोबाईलची बॅटरी लवकर संपते. अशावेळी तुम्ही लक्ष देणे गरजेचे आहे.

 

इंटरनेट लवकर संपणे

त्यावेळी आपल्या मोबाईलमधील डेटा लवकर संपतो. तर तुम्ही तुमच्या डेटा वापराकडे लक्ष दिले पाहिजे. जर तुमचा डेटा लवकर संपत असेल, तर याबाबत तुम्ही मोबाईल चेक करून घेतला पाहिजे.

 

नको असलेले पॉप-अप आणि जाहिराती बंद करणे

आपण फोनच्या सेटिंमध्ये जाऊन आपल्याला नको असलेले पॉप अप्स बंद केले पाहिजे. कारण हे फोन मधील मालवेअरच्या एन्ट्री साठी फायद्याचे असू शकतात. तसेच आपल्या फोनवर काही काही अनावश्यक जाहिराती दिसतात. त्या देखील बंद करायच्या आहेत.

 

?

आपल्या फोनमध्ये आवश्यक एवढेच ॲप इन्स्टॉल करावे नको असलेले ॲप इन्स्टॉल करू नये.

तसेच कोणताही ॲप इंस्टॉल करताना त्याच्या सगळ्या परमिशन चेक कराव्यात.

फोनवर ॲप डाऊनलोड करताना गुगल प्ले स्टोअर आणि एप्पल प्ले स्टोअर वरूनच ॲप डाऊनलोड करा.

कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

मोबाईलमधील सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -