धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. दिवसभरात तब्बल तीन फुटाने पाण्याची पातळी वाढली आहे. पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत चालली असून पुन्हा जुना पुल वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे.
बंदा पावसाने सुरुवातीपासून दमदारपणे हजेरी लावली आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील विविध लहान मोठे धरणे भरण्याच्या मार्गावरत आहेत. अनेक लहान धरणे भरले आहेत. पंचगंगाच्या नदीच्या पातळीत ही कमी जास्त प्रमाणात वाढ आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे यापूर्वी जुना पुल दोनवेळा वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होता. पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने पंचगंगा नदीची पातळी मंगळवारी सायंकाळी ४८.१० फुटावर आली होती. दिवसभरात ३ फुटांनी वाढ झाली + आहे.