राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ईकेवायसी पुन्हा एकदा सुरु केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने परिपत्रक काढत यासंदर्भात माहिती दिली आहे. मात्र, अनेकांना ईकेवायसी करताना ‘हा आधार क्रमांक EKYC दुरुस्तीच्या यादीत नाही’, असं मेसेज येतो आहे.
त्यामुळे महिलांच्या मनात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. याचा नेमका अर्थ काय? जाणून घेऊया.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलांची EKYC रखडली आहे. त्यांनाच ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणजे ज्यांनी आधी केवायसी केली आहे. किंवा चुकीची माहिती भरली आहे. त्यांना फक्त EKYC करावी लागणार आहे. त्यामुळे ‘हा आधार क्रमांक EKYC दुरुस्तीच्या यादीत नाही’ असा मेसेज जर येत असेल तर तुमची EKYC आधीच पूर्ण झाली आहे किंवा त्यात कोणतीही दुरुस्ती नाही.
अशी परिस्थितीत महिलांना चिंता करण्याचं कोणतही कारण नाही. ज्यांनी योग्य माहिती दिली आहे, त्यांना पुन्हा EKYC करण्याची गरज नाही. त्यासाठी कुणाला पैसे देण्याचीही गरज नाही. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जवळच्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा, असं आवाहनही आता सरकारकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी पोर्टल शुक्रवारपासून सुरु करण्यात आले आहे. मागच्या काही दिवसांपासून ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने लाडक्या बहिणींचे पैसे थांबले होते. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आदेश काढून पोर्टल सुरू केले आहे. यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून आता 31 मार्चपर्यंत केवायसी करता येणार आहे.





