ENGvsIND 4th test D5 : अखेर शार्दुलने घेतली पहिली विकेट


भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी ( ENGvsIND 4th test D5 ) इंग्लंडने बिनबाद ७७ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. सलामीवीर रोरी बर्न्स आणि हासीब हमीद या दोघांनी सावध फलंदाजी करत सलामी भागीदारी शतकापर्यंत नेली. दरम्यान बर्न्सने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र जोडी ब्रेकर असलेल्या शार्दुल ठाकूरने बर्न्सला ५० धावांवर बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले.


भारतासमोर इंग्लंडच्या दहा विकेट घेण्याचे आव्हान असणार आहे. दुसऱ्या बाजूला इंग्लंडच्याडोक्यावर ३६८ धावांचे आव्हान आहे.


सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळपट्टीवरील रफ पॅचचा फायदा घेण्यासाठी विराटने रविंद्र जडेजाकडून तब्बल १३ षटके टाकून घेतली मात्र त्याला सलामी जोडी फोडणात यश आले नाही. रविंद्र जडेजाने उजव्या हाताचा फलंदाज हामीदला त्याच्या पायवर गोलंदाजी करण्याची रणनीती अवलंबली. मात्र ही रणनीती फार काही कमाल दाखवू शकली नाही.


इंग्लंडच्या ४८ षटकात १ बाद ११२ धावा
सिराजने अर्धशतकवीर हामीदचा झेल सोडला
रोरी बर्न्स ५० धावा करुन बाद
शार्दुल ठाकूरने इंग्लंडची शतकी सलामी देणारी जोडी फोडली
रोरी बर्न्सचे अर्धशतक, इंग्लंडची नाबाद शतकी सलामी
इंग्लंड पाचव्या दिवशी बिनबाद ७७ धावांपासून पुढे खेळणार
भारताला विजयासाठी १० विकेट्सची गरज
इंग्लंडला विजयसाठी अजून २९१ धावांची गरज

Leave a Reply

Join our WhatsApp group