Wednesday, July 16, 2025
Homeब्रेकिंगसमाजाकडून दुर्लश दोन घटना…तीन मृत्यू…

समाजाकडून दुर्लश दोन घटना…तीन मृत्यू…

लोकांचे रक्त घेऊन रुग्णाना वाटत होता. रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत होता. त्यालाच पक्षाघाताने गाठले आणि सीपीआरमध्ये उपचार घेत असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला. एका साधारण व्यक्तीचा तितकाच साधारण मृत्यू अशीच या रक्तमित्राची समाजाने दखल घेतली. एक घटना नियतीने केलेल्या अन्यायाची, नशिबाने मांडलेल्या थट्टेची तर दुसरी घटना समाजाकडून झालेल्या दुर्लक्षाची.

शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर गल्लीत राहणारे जाधव कुटुंब. पती पत्नी आणि पोरगा असं हे त्रिकोणी कुटुंब. एकुलत्या एक पोराचं दिव्यांगत्व आणि त्याची जबाबदारी हा एक अदृश्य चौथा कोन या कुटुंबाला चिकटलेला. आर्थिक स्थिती जेमतेम. जाधव हे पिग्मी एजंट म्हणून काम करायचे.

दिव्यांग पोराची रोजची नीट व्यवस्था लावून घराबाहेर पडायचे. त्यांची सावली आणि दिव्यांग पोराची माऊली अचानक कायमची हे जग सोडून गेलेली. पिग्मी गोळा करण्यासाठी जाधवांच्या पायाला भिंगरी लागलेली आणि दिव्यांग पोराला हव नको ते बघणारी त्यांची पत्नी ही आता या जगात नव्हती. कामासाठी म्हणून शरीराने बाहेर पण मन मात्र घरात अशी त्यांची सध्याची अवस्था होती.आपलं आता वय झालंय, आपला मुक्कामही आता बिन भरवशाचा. तो कोणत्याही क्षणी संपेल, मग आपल्या दिव्यांग पोराचं काय होणार या प्रश्नाने ते खचले होते. अचानक त्यांना या गंभीर प्रश्नाचं उत्तर सापडलं. त्यांनी मग पहिल्यांदा आपल्या दिव्यांग पोराला विष पाजलं. आपला बाप नेहमीसारखंच काहीतरी प्यायला देतोय, असं समजून तो ते प्यायला. त्याची जीव जातानाची अखेरची फडफड, तडफड पहायला नको म्हणून त्यांनीही पाठोपाठ विष प्राशन केले. दोघांचाही चार भिंतीच्या आत खडतर जीवन प्रवास संपला. संपूर्ण शिवाजी पेठ या बाप लेखाच्या मृत्यूने हळहळली.

हार्टलेस, हृदयशून्य नियतीविषयी थोडी फार चर्चा झाली हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरली. शिवाजी पेठेतील या बाप लेकाच्या मृत्यूने हृदयात कुठेतरी कालवाकालव झाली. दिव्यांग पोराला एखाद्या केअर सेंटरमध्ये ठेवणे आणि स्वतः वृद्धाश्रमात जाणे हे दोन पर्याय जाधव यांच्या समोर होते पण आता तिथेही हल्ली पैसे मोजावे लागतात आणि नेमका पैसा त्यांच्याकडे नव्हता. म्हणून मग त्यांनी पलायनवाद स्वीकारला. वास्तविक अशा प्रकारचं आयुष्य जगणाऱ्यांच्या दारी शासनाने पोहोचले पाहिजे.अनिल कानकेकर असाच एक झपाटलेला कार्यकर्ता. राजर्षी शाहू ब्लड बँकेला तो आपली सेवा द्यायचा. रक्तदान हे त्याने आपल्या सामाजिक कामाचे क्षेत्र म्हणून निवडले होते. अक्षरशः झपाटल्यासारखा तो काम करत राहिला. रक्तदान शिबिरे घेत राहिला. रक्त बाटल्यांचा संचय करून ते रक्तपेढीला पोचवत राहिला. रक्तदान शिबिरासाठी त्याला कारणे लागत नव्हती किंवा कारणांची त्याला कमी नव्हती.

नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार प्रसंगी नामदार यांना तो प्रमुख पाहुणे म्हणून रक्तदान शिबिरासाठी आमंत्रित करत होता. आपल्या कामाची कुणीतरी दखल घेईल, असे त्याला वाटत होते. रक्तदान श्रेष्ठदान याचा प्रसार करण्यासाठी तो धावायचा, धावाधाव करायचा. अचानक त्याला पक्षाघाताने गाठले. त्याच्यावर उपचार सुरू झाले. मुलासाठी हे नवीन होते. बापाच्या उपचारासाठी तो भिरभिरत राहिला. बापाची सेवा करू लागला.

अनिलने आयुष्यभर रक्तदानाचे सेवा व्रत घेतले होते. त्याला सर्वजण रक्तमित्र म्हणत असत. त्याने एका वेगळ्या अर्थाने रक्ताची शेकडो नाती जोडली होती. पण तो विकलांग अवस्थेत रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना, कोणाही नेत्याची, राजकारण्याची, लोकप्रतिनिधींची पाऊले सीपीआरकडे वळली नाहीत किंवा त्याच्या प्रकृतीची साधी चौकशीही केली नाही. त्याने अखेरचा श्वास घेतला

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -