इचलकरंजी :लायन्स गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

ताजी बातमी /ऑनलाइन टीम.

इचलकरंजी :- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी संपूर्ण देशभर साजरा होणाऱ्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीने गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर केले. गेल्या अनेक वर्षांपासून लायन्स क्लबने गुणवंत शिक्षक पुरस्काराची परंपरा जोपासली आहे. कोणतेही अर्ज किंवा शिफारस न मागविता ही निवड करणेत येते. त्यामुळे या पुरस्काराचे महत्व अधिक उंचावले आहे.

        यावर्षीच्या लायन्स गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठीची निवड कमिटी चेअरमन ला. गजानन होगाडे यांनी केली. यासाठी त्यांना ला. लिंगराज कित्तुरे व ला. सुरज दुबे यांचे सहकार्य लाभले. लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष ला.लक्ष्मीकांत भट्टड यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे जाहीर केली.

  विविध शैक्षणिक विभागातून निवडण्यात आलेल्या गुणवंत शिक्षकांमध्ये महाविद्यालयीन विभागातून प्रा. राजेंद्र आमगोंडा पाटील (दत्ताजीराव कदम टेक्सटाइल अॅण्ड इंजिनीअरीग इन्स्टिट्यूट), उच्च माध्यमिक विभागातून श्री रवींद्र आनंदराव चौगुले (श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज,इचलकरंजी.),माध्यमिकविभागातून श्री. रियाज निजाम आळतेकर(साई इंग्लिश स्कूल), प्राथमिक विभागातून सौ. शर्मिष्ठा श्रीनिवास फाटक (माई बाल विद्यामंदिर) व बालवाडीविभागातून सौ. साधना आंनदराव  सूर्यवंशी (वाघमारे) (गर्ल्स हायस्कूल इचलकरंजीचा बालवाडी विभाग) यांचा समावेश आहे. या निवडी जाहीर झाल्यावर पुरस्कार प्राप्त गुणवंत शिक्षकांचे सर्व थरातून अभिनंदन  होत आहे.

  लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या आयोजित केलेल्या जनरल मिटींगमध्ये हे पुरस्कार जाहीर केले यावेळी माजी प्रांतपाल PMJF ला. विजयकुमार राठी, MJF ला. डॉ.  विलास शहा, क्लबचे सचिव ला. शैलेंद्र जैन, खजिनदार ला. महेंद्र बालर झोन चेअरमन ला. महेश सरडा व क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Join our WhatsApp group