अखेर मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यावर जेसीबी!


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड गावातील वादग्रस्त होत चाललेल्या बंगल्यावर अखेर हातोडा पडला आहे. समुद्रकिनारी होत असलेल्या या बंगल्याच्या बांधकामावरून भाजपने रान उठवले होते.


या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेतली होती. मिलिंद नार्वेकर (milind narvekar) यांच्या बंगल्याचे बांधकाम सीआरझेड ३ मध्ये येत असल्याने त्याला आक्षेप घेण्यात आला होता.
बेयकादेशीर बांधकाम पाडण्याचे तातडीने आदेश देऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वीच मुरुड गावाला भेट देऊन बांधकामाची पाहणी केली होती.


या बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नार्वेकर यांनी घेतली नसल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. मुख्यमंत्री कार्यालयातील दबावाने रत्नागिरी जिल्हा प्रशास राजकीय नेत्यांची पाठराखण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता..

Leave a Reply

Join our WhatsApp group