मिरजेच्या प्रमुख चौकाचे सुशोभीकरण आराखडा तयार..!

मिरजेच्या प्रमुख चौकाचे सुशोभीकरण आराखडा तयार..!गेले अनेक वर्षे भकास झालेले चौकांचे सुशोभीकरण होणार असल्याने मिरज शहराच्या सौंदर्यात भर पडणार

स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांचे विशेष प्रयत्नातून मिरज शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील चौक,छत्रपती शाहू महाराज चौक,किसान चौक, महात्मा गांधी चौक,गाढवे चौक या चौकांचे सुशोभीकरण तसेच न्यू इंग्लिश स्कूल मागील भागामध्ये अत्याधुनिक असे चिल्ड्रन्स पार्क या कामांची लवकर सुरवात होणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी दिली.यावेळी नगरसेवक संदीप आवटी , भाजपाचे शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक विलास देसाई, महेश पाटील हे उपस्थित होते सांगली शहरातील चौक सुशोभीकरण काम पूर्ण झाले.पण मिरज शहरातील चौक मात्र भकास झाले होते.स्थायी समिती सभापती यांनी शहरातील विविध चौक आणि उद्यान सुशोभीकरण करण्यासाठी मोठा निधी मंजूर करून मिरज शहराच्या सौंदर्यात भर टाकली आहे याची माहिती निरंजन आवटी यांनी दिली आहे.

Join our WhatsApp group