आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा, महत्त्व आणि मुहूर्त

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आज रक्षाबंधन आहे. हिंदू धर्मात अनेक सण साजरे केले जातात, मात्र भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचे वेगळेच महत्त्व आहे. रक्षाबंधन हे भाऊबहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, हा सण दरवर्षी महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधते आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तसेच भाऊसुद्धा बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतामध्ये ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने हा सण साजरा करण्यात येतो. राखी या शब्दामध्ये रक्षण कर म्हणजेच सांभाळ कर असा संकेत देण्यात आला आहे.

रक्षाबंधनाचा मुहूर्त
हिंदू दिनदर्शिकेनुसार, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा आज गुरुवार, 11 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.38 वाजता सुरू होत आहे, आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7.05 वाजता समाप्त होईल. यावर्षी 11 ऑगस्ट 2022 रोजी भा. बहिणीचा पवित्र सण रक्षाबंधन साजरा होणार आहे. राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 09.28 ते रात्री 09.14 पर्यंत असेल. यावेळात तुम्ही राखी बांधू शकता.

Join our WhatsApp group