Friday, April 26, 2024
Homeतंत्रज्ञानव्हॉट्सॲपवर स्क्रिनशॉट घेणे बंद होणार? वाचा खास फिचरबद्दल..

व्हॉट्सॲपवर स्क्रिनशॉट घेणे बंद होणार? वाचा खास फिचरबद्दल..

व्हॉट्सॲप आपल्या यूजर्ससाठी खास फिचर आणणार आहे. महत्वाचं म्हणजे हे फिचर सुरक्षिततेच्या दृष्टीने आणलं जाणार आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोंना view once फिचरद्वारे अधिक प्रायव्हसी दिली जाणार आहे.

कसं असेल नवीन फिचर..?

कोणत्याही यूजरने view once फिचरने फोटो सेंड केला तर समोरील व्यक्तीला त्या फोटोचा स्क्रिनशॉट घेता येणार नाही.

रिपोर्टनुसार, जर एखादा युजर्स आपण View Once द्वारे सेंड केलेल्या फोटोचा स्क्रिनशॉट घेत असेल तर व्हॉट्सअ‍ॅपची ही सुविधा स्क्रिनशॉट ब्लॉक करेल.

View Once पर्यायाचा वापर करून पाठवलेले फोटो व व्हिडिओचे स्क्रिनशॉट घेणार्‍या युजर्सला एक एरर मेसेज दिसणार आहे. त्या मेसेजमध्ये Can’t Take screenshot Due to Security Policy असं लिहिलेलं दिसेल.

जर हे फिचर युजर्सच्या व्हॉट्सअप अकाऊंटला चालू केले असेल तर, स्क्रिनशॉट घेणार्‍या व्यक्तीला स्क्रिनशॉट घेता येणार नाही, व्हॉट्सॲप त्यासाठी परवानगी देणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -