Homeइचलकरंजीआरक्षित जागांच्या मोबदल्यासाठी १०० कोटींचा निधी आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश

आरक्षित जागांच्या मोबदल्यासाठी १०० कोटींचा निधी आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश

इचलकरंजी महानगरपालिका हटीतील विकास आराखड्यातील विविध विकासकामांसाठी आरक्षित जागा संपाद‌नासाठी १०० कोटी रुपयांचा विशेष निधी देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिली आहे. या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी शासन दरबारी केलेल्या प्रभावी पाठपुराण्यामुळे हा निधी उपलब्ध झाला असून, शहराच्या विकासातील एक मोठा आर्थिक अडसर दूर झाला आहे.

 

इचलकरंजी शहराच्या विकास योजनेत अनेक भूखंड सस्ते, उद्याने, शाळा, दवाखाने, खेळाची मैदाने आणि सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. मात्र, या जागांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी महापालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकल्प रखडले आहेत. संबंधित जागामालकांना मोबदला न मिळाल्यामुळे कायदेशीर

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी करताना आम. राहुल आवाडे शेजारी महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाल्या, स्थायी समितीचे अध्यक्ष सतिश मुळीक

 

अडचणी व विकासकामांना ब्रेक लागत होता, शिवाय जागा मालकास मोबदला वेळेत मिळत नसल्याने काही व्यापारी, एजेंट हे कमी दरात करार करून जागा हडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींना हाताशी धरून कायदेशीर नोटीस देऊन

 

महानगरपालिकेकडून संबंधित जागेवर टाकण्यात आलेले आरक्षण रद्द करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर टीडीआरनुसार होणारी रक्कम घेण्यास जागा मालक नकार देत असल्याने विकासकामात अडचणी निर्माण होत असल्याबद्दल आमदार आवाडे यांनी सविस्तर विवेचन

 

केले. या सर्व पाश्र्वभूमीवर आमदार राहुल आवाडे यांनी राज्य शासनाकडे विशेष आर्थिक तरतुदीची मागणी लावून धरली होती. १०० कोटींच्या या भरीव निधीमुळे महापालिकेला जागांचे तातडीने भूसंपादन करून ज्या कारणांसाठी त्या आरक्षित केल्या त्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात करता येणार आहे. या माध्यमातून शहराचा सुनियोजित विस्तार होण्याबरोवरच बाढत्या लोकसंख्येला पुरेशा सार्वजनिक सुविधा उपलब्ध करणे शक्य होईल.

 

इचलकरंजी शहराचा कायापालट करण्यासाठी सुनियोजित पायाभूत सुविधांची उभारणी आवश्यक आहे. आरक्षित जागांच्या मोबदल्याचा प्रश्न सुटल्यामुळे अनेक वर्षांपासून बेतील. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आमदार राहुल आवाडे यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -