Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगएप्रिलपासून दुप्पट होऊ शकतात घरगुती गॅसच्या किमती

एप्रिलपासून दुप्पट होऊ शकतात घरगुती गॅसच्या किमती

सर्वसामान्य ग्राहकांना पुन्हा एकदा वाढत्या महागाईचा फटका सहन करावा लागू शकतो. त्याचा परिणाम एलपीजी ग्राहकांच्या खिशावर होऊ शकतो. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींचा तुमच्या घरच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जागतिक गॅस टंचाईमुळे एप्रिलपासून शिजवलेले अन्न खाणे महाग होऊ शकते. झी न्यूज हिंदीमधील एका रिपोर्टनुसार या जागतिक गॅस संकटाचा परिणाम लवकरच भारतातील घरगुती गॅसच्या किमतींवर होऊ शकतो. यामुळे एप्रिलपासून गॅसच्या कमती दुप्पट होऊ शकतात.

जागतिक संकटामुळे सीएनजी, पीएनजी आणि विजेच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. यामुळे उद्योगांचा वाहतूक खर्च आणि परिचालन खर्चही वाढेल. या सर्व घटकांचा थेट फटका ग्राहकांना बसू शकतो.

रशिया त्याच्या अंतरमहाद्वीपीय पाइपलाइनद्वारे संपूर्ण युरोपमध्ये गॅसचा प्रमुख पुरवठादार आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु दोन्ही देश युद्धाच्या उबरठ्यावर उभे आहेत. या संकटामुळे गॅस पुरवठा खंडित होऊ शकतो. जागतिक अर्थव्यवस्था हळूहळू कोविड-19 महामारीच्या प्रभावातून सावरत असताना जगभरातील वाढती ऊर्जेची मागणी विकासाला अस्थिर करू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -