ताजी बातमी ऑनलाइन टीम
उन्हाळ्यात कोरोणाची भीती वाढली आता उन्हाळा आल्या आसून काही संशोधकांनी (Researcher) अलीकडेच एका अभ्यास अहवालाद्वारे जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.या अंदाजादरम्यान, आता कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनीही उन्हाळ्यात आर्द्रता वाढल्याने विषाणू फोफावणार असल्याचे संकेत दिले आहेत.
हे टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करणे. त्याच वेळी, बीएमसीला चाचणी, ट्रॅकिंग आणि लसीकरणावर भर देण्यास सांगितले आहे.
निश्चित कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे, पण शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या चौथी लाट येणार असल्याचे अनुमान लावले आहेत. आयआयटी कानपूरच्या (IIT Kanpur) शास्त्रज्ञांनी चौथी लहर 22 जूनच्या आसपास येण्याची आणि 24 ऑक्टोबरपर्यंत राहण्याची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनीही उन्हाळ्यात विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. टास्क फोर्सचे डॉ.शशांक जोशी आणि डॉ.राहुल पंडित यांनी तसे संकेत दिले आहेत.
डॉ. शशांक जोशी यांच्या मते, पाश्चात्य देशांमध्ये थंडीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होतो, तर भारतात उन्हाळा आणि वसंत ऋतूमध्ये. हाच कल पहिल्या दोन लहरींमध्ये दिसून आला आहे. ते म्हणाले की, उन्हाळ्यात आर्द्रता जास्त असते आणि आर्द्रता वाढली की विषाणू वाढतात असे निदर्शनास आले आहे. टास्क फोर्सचे आणखी एक सदस्य डॉ. राहुल पंडित यांनीही त्याविषयी हेच मत मांडले आहे. डॉ.पंडित यांनी सांगितले की, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत उन्हाळ्यातच कोरोनाचा उच्चांक होता. थंडीच्या मोसमात तिसऱ्या लाटेने दार ठोठावले असले तरी मुंबईत थंडीचे प्रमाण फार कमी आहे.
मास्क, चाचणी, ट्रॅकिंग आणि लसीकरण यावर भर
डॉ.राहुल पंडित म्हणाले की, बीएमसी पहिल्या लाटेपासूनच कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा मागोवा घेत आहे. यावर अजूनही भर द्यायला हवा. आता जे रुग्ण सापडत आहेत, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचा माग काढला पाहिजे, जेणेकरून विषाणूची साखळी तोडता येईल. चाचणी आणि लसीकरणही कमी दिसत असल्याने ते वाढवण्यावर भर द्यावा, असे ते म्हणाले. याद्वारे प्रत्येक लहर टाळता येते.