बहुतेक क्रिप्टोकरन्सी मार्केट आज शनिवारी रेड मार्क वर ट्रेड करत आहे. आज शनिवारी, जागतिक क्रिप्टो बाजार 2.8% ने घसरून $1.96 ट्रिलियनवर आला. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत एकूण क्रिप्टो मार्केट व्हॅल्यू 9.4 टक्क्यांनी वाढून $89.50 अब्ज झाले आहे. जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनची मार्केट कॅप 0.03 टक्क्यांनी घसरून 40.99 टक्क्यांवर आली आहे.
Tether USD (0.55 टक्के वर) वगळता,
सर्व प्रमुख क्रिप्टोकरन्सी आज घसरत आहेत. Bitcoin 2.5 टक्क्यांहून अधिकने घसरला तर Ethereum एक टक्क्यांहून अधिकने घसरला. Dogecoin जवळपास सहा टक्क्यांनी, Avalanche 5.8 टक्के आणि Ripple आज तीन टक्क्यांहून अधिकने खाली आहे.
Seesaw Protocol (SSW) त्याच वेळी, Seesaw Protocol (SSW) मार्केटच्या विपरीत सतत वाढत आहे. प्रीसेल सुरू झाल्यापासून हे चलन 4100% ने वाढले आहे. कदाचित Seesaw Protocol (SSW) करन्सी आज किंवा उद्या लिस्ट केले जाईल. हे चलन लिस्टिंग पूर्वीच वेगाने धावत आहे. त्याची प्रीसेल जानेवारीमध्ये सुरू झाली. म्हणजेच अवघ्या तीन महिन्यांत हे चलन हजारो पटीने वाढले आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम
गेल्या एक महिन्यापासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या दरम्यान क्रिप्टो मार्केटमध्ये प्रचंड गोंधळ सुरू आहे. युक्रेनला सतत मोठ्या प्रमाणात क्रिप्टो डोनेशन मिळत आहेत. युक्रेनचे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्रालय युक्रेनच्या हितसंबंधांबद्दल जगाला माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा जोरदार वापर करत आहे. युक्रेनियन सरकारने क्रिप्टोमधून $100 मिलियन पेक्षा जास्त उभे केले आहे. आता युरोपियन युनियनने शुक्रवारी सांगितले की ते क्रिप्टो वॉलेटमध्ये पैसे जमा करण्यावर बंदी वाढवत आहे. त्यामुळे क्रिप्टो मार्केटमध्ये घसरण होत आहे.