Monday, December 23, 2024
Homeराजकीय घडामोडीपवारांच्‍या निवासस्‍थानावरील हल्ल्यामागे संजय राऊत यांचा हात : प्रवीण दरेकर यांचा आराेप

पवारांच्‍या निवासस्‍थानावरील हल्ल्यामागे संजय राऊत यांचा हात : प्रवीण दरेकर यांचा आराेप

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्‍थानावर झालेल्‍या हल्‍ल्‍यामागे शिवसेना खासदार संजय राऊत यांचा हात आहे, असा आराेप विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज केला.

ईडीची कारवाई झाल्‍यामुळे राऊत हे वाटेल ते आराेप करत आहेत.  प्रसिध्दीसाठी ते काहीही करू शकतात. पवारांच्‍या निवासस्‍थानावर झालेला ह्‍ल्‍ला हा  संजय राऊत यांचा प्लॅन नव्‍हता ना,  याची चौकशी व्हावी, अशी मागणीही  दरेकर यांनी  केली.

एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्‍ला केला हाेता. यावर  राजकीय प्रत्यारोप सुरु झाले आहेत.  भाजपनेच हा हल्‍ला घडवून आणल्‍याचा आराेप संजय राऊत यांनी केला. याला प्रत्‍युत्तर देताना हा हल्‍ला संजय राऊत यांनी घडवला नाही ना, असा सवाल करत दरेकर यांनी राऊत यांच्‍यावर निशाणा साधला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -