कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणांतर्गत विभागात पाऊस पडत आहे. तसेच धरणात प्रतिसेकंद सरासरी २३,९१० क्युसेक्स पाणी येत आहे.
त्यात धरणातील उपलब्ध १०३.८४ टीएमसी पाणीसाठा व संपुष्टात आलेली पाणीसाठवण क्षमता लक्षात घेऊन धरणाचे सहा वक्री दरवाजे रविवारी दुपारी दोन वाजता एका फुटाने वर उचलण्यात आले. त्यातून प्रतिसेकंद ९२१४ क्युसेक्स व धरण पायथा वीजगृहातून एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून १०५० क्युसेक्स असे प्रतिसेकंद एकूण १०,२६४ क्युसेक्स पाणी कोयना नदी पात्रात सोडण्यात आले आहे. कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
धरणातून प्रतिसेकंद १०,२६४ क्युसेक्स विसर्ग
१०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या १०३.८४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. आता धरणात केवळ १.४१ टीएमसी इतकेच पाणी सामावून घेतले जाऊ जाऊ शकते. त्याचवेळी सध्या प्रतिसेकंद धरणात सरासरी २३,९१० क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे.
त्यामुळे सध्या येणारे पाणी, धरणाची संपुष्टात आलेली साठवण क्षमता व अद्यापही प्रलंबित असलेला पाऊस लक्षात घेता कोयना धरण व्यवस्थापनाने रविवार पासून पुन्हा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी दुपारी दोन वाजता धरणाचे सहा वक्री दरवाजे एका फुटाने वर उचलून त्यातून ९,२१४ क्युसेक्स व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून १०५० क्युसेक्स असे एकूण १०,२६४ क्युसेक्स पाणी प्रतिसेकंद कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाण्याची आवक वाढली तर…
यापुढे धरणातील पाण्याची आवक वाढली तर याहीपेक्षा ज्यादा प्रमाणात पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येईल, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे फुटाने वर उचलले
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -