ताजी बातमी ऑनलाईन टीम
चंदीगड – पंजाबी गायक सिद्ध मुसेवाला याच्या हत्याकांडानंतर आता पंजबाच्या जेलमध्ये गँगवॉर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गँगस्टर ग्रुप एकमेकांना य हत्येनंतर धमक्या देत आहेत. यामुळे सरकारही सतर्क झाले असून प्रसिद्ध अधिकारी हरप्रीत सिंद्ध यांच्याकडे जेलचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. हरप्रीत आत्तापर्यंत ड्रग्जच्या विरोधात कारवाई करणाऱ्या स्पेशल टास्क फोर्समध्ये कार्यरत होते. सिद्ध मुसेवाला याची २९ मे रोजी संध्याकाळच्या सुमारास मानसामध्ये गोळ्या मारुन हत्या करण्यात आली होती.
त्यानंतर त्याच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स गँगने स्वीकारली होती. त्यानंतर आता सिद्ध याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अनेक गँगस्टर्सही पुढे सरसावले आहेत. राज्यात भगवंत मान यांचे आपचे सरकार सत्तेत आल्यानंतर, सिद्ध याच्या हत्येने पंजाब अद्यापही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.
त्यात राजकारण, गुन्हेगारी आणि गँगस्टर्स यांचे मोठे नेक्सस यानिमित्ताने समोर येईल की काय, अशी शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती राज्यात मुसेवालाच्या हत्येनंतर गँगस्टर सक्रिय
मुसेवाला याच्या हत्येनंतर आता सोशल मीडियावरुन गँगस्टर एकमेकांना धमक्या देत आहेत. मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्सच्या गँगने घेतली होती. त्यानंतर गँगस्टर दविंदर बंबीहा आणि गँगस्टर विकी गौंडर गँग यांनी या हत्येचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. मुसेवालाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दिल्ली आणि हरियाणातील गँगस्टरही सक्रिय झाल्याची माहिती आहे, गँगस्टर नीरज बवाना, भूप्पी राणा, कौशल चौधरी यांनीही मुसेवालाच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. त्यांच्या निशाण्यावर लॉरेन्स गँग आहे.