ताजी बातमी ऑनलाईन टीम
मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे गट तसेच पंचायत समित्यांच्या गणांची रचना गुरुवारी जाहीर झाली. रचना जाहीर होताच इच्छुकांमध्ये ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे वातावरण जिल्ह्यात पाहावयास मिळते. ज्यांच्या मतदारसंघात फारसा फरक करण्यात आलेला नाही, अशा कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. परंतु, ज्या इच्छुकांच्या गट अथवा गणांची रचना गैरसोयीची झाली आहे, विविध गटांत विभागला आहे अशा कार्यकर्त्यांमधून मात्र नाराजी व्? यक्त होत आहे. त्यामुळे काहीजण या प्रभाग रचनेला न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत असल्?याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून इच्छुक उमेदवार, लोकप्रनिधी यांच्या नजरा जि.प., पं.स.च्या प्रारूप रचनेकडे लागल्या होत्या. अखेर गुरुवारी जाहीर झालेल्या प्रारूप रचनेनंतर आता आरक्षणाकडे नजरा लागून राहिल्या आहेत.
लक्ष्मीचे काका सुंदर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हुक्केरी तालुक्यातील सुलतानपूर येथील लक्ष्मी हिचा विवाह नोव्हेंबर 2021 मध्ये निलजी येथील कलगोंडा पाटील याच्याशी झाला होता. कलगोंडा हा संकेश्वर येथे खासगी संस्थेत नोकरीस आहे. गुरुवारी सकाळी लक्ष्मी हिने मडी नावाच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबत माहेरच्या मंडळींना माहिती कळताच 7.30 च्या सुमारास त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर लोक येऊन त्यांनी लक्ष्मी हिच्या पतीसह घरच्यांना जाब विचारत जोरदार धक्काबुक्की केली. याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्वांनाच पोलिस ठाण्याकडे आणले. त्यानंतर सिदपाटील यांनी अज्ञात कारणावरून लक्ष्मी हिने आत्महत्या केल्याचे फिर्याद दिली. लक्ष्मी हिच्या माहेरच्यांनी मात्र आपल्या मुलीला दोन लाख रुपये व दोन तोळे दागिन्यांसाठी शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला. संबंधितांना अटक होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. अखेर पोलिसांनी माहेरच्या मंडळींची फिर्याद दाखल करून घेतली.