ताजी बातमी ऑनलाईन टीम
राजीव गांधी झोपडपट्टी कुपवाड येथे राहणाऱ्या जावेद नुरमहमद गंवडी यांचा दिनांक १३ मे २०२२ रोजी संजयनगर येथे खून झाला होता.हा खून झाल्याचे कारण असे की तौफीक कुरणे यांच्या बहिणीला जावेद हा त्रास देत असल्याचे तौफिक च्या बहिणीने सांगितले असता.तौफिक अल्लाउद्दीन कुरणे राहणार अष्टविनायक मंदीराजवळ संजयनगर सांगली आणि अमित उर्फ आठल्या नागेश आठवले वय वर्ष २८ राहणार दत्त मंदीर जवळ खाॅजा काॅलनी संजयनगर सांगली ह्या दोघांनी मिळून जावेद गंवडी याला शिवीगाळ करत धारधार चाकूने आणी ऐडकेने गंभीर जखमी करुन खून केला होता.
तर पोलिसांनी तौफिक कुरणे याला ताब्यात घेतले होते तर अमित उर्फ आठल्या नागेश आठवले हा फरारी होता.तो आज सांगलीत आल्याची गोपीनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या टीमला मिळताच सापळा रचून एल.आय.सी ऑफिस शिवाजी स्टेडियम जवळ त्याला तो थांबलेला होता.त्याला पकडले आणि नाव विचारले असता त्यांने अमित उर्फ आठल्या नागेश आठवले हे नाव सांगून मी जावेद नुरमहमद गंवडी यांच्या खूनातील आरोपी असल्याचे सांगितले.त्याला लगेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे.