Saturday, December 21, 2024
Homenews30 हजार रुपयांपेक्षाही स्वस्त 5 Laptop | प्रोसेसर आणि फीचर्स जाणून घ्या

30 हजार रुपयांपेक्षाही स्वस्त 5 Laptop | प्रोसेसर आणि फीचर्स जाणून घ्या


लॅपटॉप मोबाईल नवीन घेणं म्हणजे खिशाला कात्री आणि कपाळाला आठ्या पडतात. पण आता स्वस्तामध्ये देखील लॅपटॉप उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर बेसिक किंवा तुमच्या मुलांना घेण्याचा विचार असेल तर 5 लॅपटॉप तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतात. कोव्हिडमध्ये ऑनलाईन क्लास आणि घरून काम करण्यामुळे गरज आणखी वाढली आहे. या पाच लॅपटॉपची नेमकी वैशिष्ट्यं काय आहेत हे जाणून घेऊया.


आजच्या काळात विद्यार्थ्यांसाठी स्वस्तात लॅपटॉप पाहाणं फार कठीण झालं आहे. 21 हजार रुपयांचा हा लॅपटॉप विद्यार्थ्यांसाठी फायद्याचा ठरू शकतो. यूझर इंटरफेस, गूगल असिस्टेन्ट अशा वेगवेगळ्या सुविधा यामध्ये देण्यात आल्या आहेत. 11.60 इंच स्क्रीनसोबत टचस्क्रीन डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. 1366×768 चे स्क्रीन रिझोल्यूशन, 153PPI ची पिक्सेल डेन्सिटी आणि 220nits ची उपीक ब्राइटनेस आहे.


एचपी क्रोमबुक 11 ए मीडियाटेक एमटी 8183 ऑक्टा-कोर प्रोसेसरद्वारे स्वयंचलित आहे. या लॅपटॉपमध्ये 4 GB LPDDR 4 रॅम आणि 64 GB eMMC स्टोरेज युझर्सना मिळणार आहे. याव्यतिरिक्त, यात वायफाय 5, ब्लूटूथ 5, यूएसबी 2.0 टाइप-सी पोर्ट, एक यूएसबी 2.0 टाइप-ए पोर्ट, 3.5 मिमी ऑडिओ जॅक आणि एक मायक्रो एसडी कार्ड रीडर आहे, या लॅपटॉपचे स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येणार आहे.


दुसरा लॅपटॉप आहे तो तुम्हाला 23,999 रुपयांमध्ये मिळणार आहे. जो डच डिस्प्ले आणि फ्लीप असे दोन्ही पर्याय एकातच उपलब्ध असणार आहेत. 11.6-इंच LED डिस्प्ले, 1366×768 पिक्सेल्स HD+ स्क्रीन रेझोल्यूशन आणि 16:9 ऐस्पेक्ट रेशो असं या लॅपटॉपचं फीचर आहे. या लॅपटॉपमध्ये GB RAM आणि 64GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. eMMC स्टोरेजसोबत एक एसडी कार्ड टाकून या लॅपटॉपचं स्टोरेज वाढवता येणार आहे. सेलेरॉन N4020 प्रोसेसर द्वारे हा लॅपटॉप स्वयंचलित आहे. या लॅपटॉपमध्ये गूगल प्लेस्टोर देखील देण्यात आलं आहे.
तुम्हाला विंडोज 10 प्रेफर करत असाल तर 2.4 किलोचा एसर लॅपटॉप 28,499 किंमतीत मिळेल. 15.6-इंच डिस्प्ले 1366×768 पिक्सेल रिझोल्यूशनसह, हा लॅपटॉप 2.3GHz 6th Gen Intel Core i3 प्रोसेसरद्वारे स्वयंचलित आहे. 4GB RAM आणि 1TB HDD सह उपलब्ध होणार आहे. यात इंटेल इंटिग्रेटेड एचडी ग्राफिक्स 520 देखील युझर्सना मिळणार आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, यात वायफाय 802.11, ब्लूटूथ, इथरनेट, 3 यूएसबी पोर्ट, एक एचडीएमआय पोर्ट, मल्टी कार्ड स्लॉट, माइक इन आणि आरजे 45 (लॅन) पोर्ट आहे.
29,990 रुपये किंमतीचा हा लॅपटॉप 15.6-इंच डिस्प्ले, 1366×768 पिक्सेल रिझोल्यूशन, 4GB रॅम आणि 500GB स्टोरेज आणि 2GB DDR3 AMD Radeon R5 M430 ग्राफिक्ससह. या लॅपटॉपमध्ये विंडोज 10 युझर्सला मिळणार आहे. HP 15-BA022AX 2.4GHz AMD क्वाड-कोर A8-7410 APU मिळणार आहे.


2.19 किलो वजनाच्या या लॅपटॉपमध्ये पूर्ण आकाराचे आइलँड-स्टाइल कीबोर्ड आणि एचपी ट्रूव्हिजन एचडी वेबकॅम आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, यात ब्लूटूथ 4.0, वायफाय 802.11 ac, USB आणि HDMI पोर्ट, मल्टी कार्ड स्लॉट, VGA पोर्ट, माइक इन आणि RJ45 (LAN) पोर्ट आहे.


एक किलोपेक्षा कमी वजनाचा हा लॅपटॉप लेनोवोने या वर्षी जुलैमध्ये लाँच केला होता. 10.23-इंच टचस्क्रीन डिस्प्ले, 1920×1200 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 330nits ब्राइटनेससह, लॅपटॉप 4GB रॅम, 128GB SSD आणि इंटेल इंटिग्रेटेड ग्राफिक्स यामध्ये उपलब्ध आहेत.


कंपनीचा दावा आहे की एकदा चार्ज केल्यानंतर हा लॅपटॉप 7 तास चालेल. याव्यतिरिक्त, यात 5 एमपीचा बॅक कॅमेरा, 2 एमपी सेल्फी-शूटर, एचडी ऑडिओ चिप, दोन 1 डब्ल्यू डॉल्बी स्पीकर्स, डॉल्बी ऑडिओ आणि लेनोवो डिजिटल पेन देखील मिळतो. या लॅपटॉपची किंमत 29,999 रुपये आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -