Monday, August 4, 2025
Homeब्रेकिंगबीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचा मेळावा, उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष!

बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचा मेळावा, उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष!

शिवसेनेचा दसरा मेळावा (dussehra melava)जवळ आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) नेमके काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मात्र यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. आज बुधवारी मुंबई (Mumbai) महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा होणार आहे. सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचा हा मेळावा होत आहे. यामुळे या मेळाव्यात उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार आणि पक्षाची भूमिका कशी असेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. तसेच या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना (Shivsena) मुंबई महापालिका निवडणुकीचे (BMC Election) रणशिंग फुंकणार आहे.

गोरेगाव येथे शिवसेनेचा हा मेळावा होत आहे. गोरेगाव येथील नेस्को संकुलामध्ये गटप्रमुखांच्या या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता हा मेळावा सुरु होईल. यामध्ये शिवसेनेचे नेते, उपनेते, विभागप्रमुख, लोकप्रतिनिधी आणि इतर पदाधिकारी उपस्थिती लावणार आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दसरा मेळाव्यापूर्वीच उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.

पुढील राजकीय दिशा ठरणार

शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. खरी शिवसेना आमचीच असं दोन्हीही गटांकडून सांगितले जात आहे. सुरुवातील एकमेकांवर आरोप करण्यापर्यंत हा वाद होता. मात्र आता या वादाचे रुपांतर रस्त्यावरच्या लढाईमध्ये झाले आहे. दरम्यान आता शिवसेनेचा मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. त्यामुळे पक्षाची आगामी भूमिका नेमकी काय असेल हे जाणून घेण्यास सर्वच उत्सुक आहे. यावरुन शिवसेनेची पुढची राजकीय दिशा काय असेल हे ठरणार आहे.

या विषयांवर करु शकतात चर्चा

शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्यावरुन देखील रस्सीखेच सुरु आहे. शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्यासाठी शिंदेगटाकडून देखील परवानगी मागण्यात आली आहे. शिवसेनेने देखील ही परवानगी मागितली आहे. मात्र दोघांनाही अजून अधिकृत परवानगी मिळालेली नाहीये. त्यामुळे राज्यातील राजकारणही तापले आहे. दोन्हीही गट दसरा मेळावा शिवतीर्थावर करण्यासाठी ठाम आहे. या विषयावर उद्धव ठाकरे भाष्य करु शकतात. यासोबतच शिवसेनेचे नेते संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडमध्ये आहेत. वेदांत आणि फॅाक्सकॉन सारख्या मल्टी नॅशनल कॅपन्या राज्यातून बाहेर गेल्या आहेत. त्यावरूनही सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. सत्तांतरानंतर खरी शिवसेना कोणाची? हा प्रश्नं अद्याप सुटलेला नाही. अशा सर्व राजकीय प्रश्नांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमके काय भाष्य करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -