Monday, August 4, 2025
Homeब्रेकिंगMaharashtra Rain Updates: पुढील 3-4 दिवस काही भागात मुसळधार पाऊस, राज्यात असे...

Maharashtra Rain Updates: पुढील 3-4 दिवस काही भागात मुसळधार पाऊस, राज्यात असे असणार हवामान!

राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस (Rain) पडत आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पावसाच्या सरी बसरत आहेत. राज्यातील पावसाच जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र तरी देकील काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसल्या. यासोबतच अहमदनगर, जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. यामुळे नागरिकांचे हाल झाल्याचे पाहायला मिळाला. तसेच वाहतुक देखील विस्कळीत झाली होती. दरम्यान हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यानुसार राज्यातील काही भागांमध्ये पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या भागांमध्ये मुसळधार पाऊस

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पाहता, पुढील 3-4 दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामानासह, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे ट्विट करत हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांच्याकडून देण्यात आले आहे. तसेच पावसामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली होती. यानंतर राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळला. मात्र पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. यानंतर गणेशोत्सवानंतर पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला. यानंतर नद्या, नाले ओसांडून वाहत होते. पर्यटकही पावसाचा आनंद घेताना दिसले. दरम्यान विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला. मात्र काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान देखील झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -