ताजी बातमी ऑनलाईन टीम
प्रसिद्ध जादूगार ओपी शर्मा यांनी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये जगाचा निरोप घेतला. आपल्या जादूने जगाला थक्क करणारा हा स्टार आता कायमचा गायब झाला आहे. जादूच्या जगाच्या अभिनेत्याने वयाच्या 49 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्यांना कानपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने जादूच्या जगताचं मोठं नुकसान झालं आहे.
कोरोनाच्या काळापासून ते आजारी होते. ओपी शर्मा यांचा जन्म 1973 मध्ये झाला होता आणि ते मूळचे बलियाचे होते. आपल्या जादूमुळे ओपी शर्मा यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली. ओपी शर्मा हे जादूच्या दुनियेचे राजा होते.