Saturday, August 2, 2025
HomeमनोरंजनJuhi Chawla Birthday : आज सलमान खानची पत्नी असती जुही चावला, लग्नानंतर...

Juhi Chawla Birthday : आज सलमान खानची पत्नी असती जुही चावला, लग्नानंतर 6 वर्षे लपवून ठेवलं होतं नातं!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

80 आणि 90 च्या दशकातील बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री आणि लाखो चाहत्यांच्या गळ्यातली ताईत असलेली जुही चावला आज आपला 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. 13 नोव्हेंबर 1967 रोजी अंबाला येथे जुही चावलाचा जन्म झाला होता. आज मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी सुद्धा जुही चावलाचा चाहता वर्ग मोठा आहे. मॉडेलिंग विश्वात चांगलं नाव कमावल्यानंतरच जुही चावलाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. जुहीने 1987 मध्ये रिलीज झालेल्या ‘सुलतनत’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 1988 साली प्रदर्शित झालेल्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटामुळे तिला चांगली पसंती मिळाली.



जुही चावलाने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देत बॉलिवूडमध्ये नाव कमावले आणि चर्चेत राहिली. पण खऱ्या आयुष्यात देखील ती चर्चेत होती. बॉलिवूडचा सुलतान अर्थात अभिनेता सलमान खानला जुहीसोबत लग्न करायचे होते. त्याने लग्नासाठी मागणी देखील घातली होती. जर तिने त्याच्याशी लग्न केले असते तर आज ती सलमान खानची पत्नी असली असती. पण जुही चावलाने 1995 मध्ये बिझनेसमन जय मेहतासोबत गुपचूप लग्न केले. आज जुही चावलाच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्या आयुष्यातील काही न माहिती असलेले किस्से जाणून घेणार आहोत.

सलमान खान हा बॉलिवूडमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. तो आजपर्यंत अविवाहित आहे. त्यांचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. पण एक वेळ अशी आली होती की, सलमान खान जुही चावलाला आपले हृदय देवून बसला होता. सलमानला जुही चावलास खूप आवडत होती. ऐवढंच नाही तर तो जुही चावलासोबत लग्नगाठ बांधायलाही तयार होता. पण जुही चावलाच्या वडिलांमुळे हे होऊ शकले नाही. त्याने जुहीच्या वडिलांकडे लग्नाबाबत चर्चा केली पण तिच्या वडिलांनी नकार दिला होता. ही गोष्ट सलमान खानने एका मुलाखतीमध्ये सांगितली होती.

जुही चावला आपल्या करिअरमध्ये यशस्वी होत होती तेव्हा तिने बिझनेसमन जय मेहता यांच्यासोबत 1997 मध्ये लग्न केले होते. जुही आणि जय यांची भेट राकेश रोशन यांनी 1992 मध्ये ‘कारोबार’च्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान केली होती. जुही चावलाने अतिशय गुपचूप आणि साधेपणाने लग्न केले होते. जुहीने आपले लग्न सहा वर्षे लोकांपासून लपवून ठेवले होते. जुही गरोदर राहिल्यावर त्यांच्या लग्नाचा खुलासा झाला.

चावलाचा पती जय मेहता हे तिच्यापेक्षा वयाने मोठा आहे. जय मेहताच्या डोक्यावर केस खूप कमी आहेत. त्यामुळे लोक जय यांच्यासोबत लग्न केल्यानंतर जुही चावलाला ट्रोल करण्यात आले होते. जुहीने जय यांच्यासोबत पैशासाठी लग्न केले होते असे टोमणे मारले जायचे. जय मेहता यांचे जुहीसोबतचे हे दुसरे लग्न आहे. त्यांचे पहिले लग्न सुजाता बिर्ला यांच्याशी झाले होते. 1990 मध्ये त्यांची पहिली पत्नी सुजाताचा विमान अपघातात मृत्यू झाला. यानंतर जय आणि जुही यांची जवळीक वाढली आणि नंतर त्यांनी लग्न केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -