प्रबोधिनी एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी भगवान नारायण योगनिद्रेचा त्याग करतात आणि सृष्टीची जबाबदारी हातात घेतात. यानंतर चर्तुमास संपतो आणि शुभ-मंगल कार्यक्रम सुरू होतात.
या एकादशीचे व्रत केल्यानं मनुष्य जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन वैकुंठधामला प्राप्त होतो, असे पुराणात सांगितले आहे. देव प्रबोधिनी एकादशीच्या संदर्भात शास्त्रांमध्ये काही विशेष नियम सांगण्यात आले आहेत, या नियमांचे पालन केल्याने भाग्य वाढते आणि जीवन शुभ राहते. व्रत करणाऱ्यांनी या नियमांकडे दुर्लक्ष करू नये. देव प्रबोधिनी एकादशीला लाभ मिळवण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याविषयी जाणून घेऊया.
देव प्रबोधिनी एकादशीला काय करावं –
देव प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर सकाळी उठून स्नान करून ध्यान करावे, उपवासाचा संकल्प करावा आणि पितरांच्या नावाने दानही करावे.
भगवान विष्णूला अभिषेक करा आणि देशी तुपाचा दिवा लावून आरती करा. यानंतर विष्णु सहस्त्रनाम पठण करावे व श्री हरी स्तोत्राचे कीर्तन करावे.
भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करा, शक्य असल्यास त्यात ऊस देखील अर्पण करावा.
देव प्रबोधिनी एकादशी तिथीला निर्जला उपवास ठेवा आणि कार्तिक भजन आणि दान करा.
देव प्रबोधिनी एकादशीला गाईची सेवा करा आणि गरीब आणि गरजू लोकांना खाऊ घाला.
देव प्रबोधिनी एकादशीला काय करू नये –
देव प्रबोधिनी एकादशीला भाताचे सेवन टाळावे. एकादशीला भात खाणाऱ्या व्यक्तीचा पुढील जन्मात सरपटणाऱ्या प्राण्याच्या रूपात जन्म होतो, असे म्हणतात.
एकादशीला घरात किंवा बाहेर भांडणे टाळावीत आणि चुकूनही कोणाचा अपमान करू नये.
एकादशीच्या दिवशी मांस आणि मद्य सेवन टाळावे. तसेच या दिवशी लसूण, कांदा इत्यादी तामसिक पदार्थ खाणे टाळावे. उपवास नसला तरी या दिवशी फक्त सात्विक अन्नच खावे.
देव प्रबोधिनी एकादशीला तुळशीविवाह केला जातो, त्यामुळे या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नयेत.
देव प्रबोधिनी एकादशीला कोणाबद्दलही चुकीचे विचार मनात येऊ नयेत. तसेच कोबी, पालक इत्यादी गोष्टींचे सेवन टाळावे.
एकादशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने पलंगावर झोपू नये. तसेच चुकूनही नखे किंवा केस कापू नयेत.एकादशीच्या दिवशी कमी बोला आणि मनातल्या मनात भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करा.