Monday, February 24, 2025
Homeनोकरीसरकारी नोकरीची संधी! भारतीय रेल्वेत 37 हजार 842 पदांची भरती

सरकारी नोकरीची संधी! भारतीय रेल्वेत 37 हजार 842 पदांची भरती

 

 

भारतीय रेल्वे दरवर्षी लाखो रिक्त पदांसाठी भरती जाहीर करते. त्यामध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी मधील लिपिक आणि स्टेशन मास्टर या पदांचा समावेश असतो. या पदांच्या भरतीसाठी रेल्वे भर्ती बोर्ड ‘नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज परीक्षा’ (आरआरबी एनटीपीसी) घेतल्या जातात.2023 मध्ये, आरआरबी एनटीपीसीनं 37 हजार 842 पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. इयत्ता 12 उत्तीर्ण झालेले इच्छुक उमेदवार ज्युनिअर क्लार्क कम टायपिस्ट, अकाउंट्स क्लार्क कम टायपिस्ट, ज्युनिअर टाइम कीपर, ट्रेन क्लार्क अँड कमर्शियल कम तिकीट क्लार्क या पदांसाठी अर्ज करू शकतात. तर पदवीधर इच्छुक उमेदवार ट्रॅफिक असिस्टंट, गुड्स गार्ड, सिनिअर क्लार्क कम टायपिस्ट, सिनिअर कमर्शियल कम तिकीट क्लार्क, सिनिअर टाइम कीपर, कमर्शियल अप्रेंटिस आणि स्टेशन मास्टर या पदांसाठी अर्ज करू शकतात.

 

आरआरबी एनटीपीसी परीक्षा पात्रता निकष

 

– अंडरग्रॅज्युएट-स्तरातील पदांसाठी इच्छुक असलेला उमेदवार 18 ते 30 वर्षे वयोगटातील असावा आणि त्यानं इयत्ता 12वी उत्तीर्ण केलेली असावी.

– ग्रॅज्युएट-स्तरातील पदांसाठी इच्छुक असलेला उमेदवार 18 ते 33 वर्षे वयोगटातील असावा आणि तो पदवीधर असणं गरजेचं आहे.

– एससी, एसटी, ओबीसी आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट मिळेल.इच्छुक उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असला पाहिजे. त्याला कोणताही मोठा आजार नसावा.

 

आरआरबी एनटीपीसी पगार तपशील

 

आरआरबी एनटीपीसी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मिळणारं वेतन पदानुसार बदलतं. उदाहरणार्थ, ज्युनिअर क्लार्क कम टायपिस्टला 19,900 रुपये, अकाउंट्स क्लार्क कम टायपिस्टला 19,000 रुपये, ट्रॅफिक असिस्टंटला 25,500 रुपये आणि स्टेशन मास्तरला 35,400 रुपये इतका पगार मिळतो.

 

आरआरबी एनटीपीसी परीक्षेचे टप्पे

 

स्टेज 1: कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT-1)

 

स्टेज 2: कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT-2)

 

स्टेज 3: कॉम्प्युटर बेस्ड अॅप्टिट्युड टेस्ट / टायपिंग टेस्ट

 

स्टेज 4: डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनआरआरबी एनटीपीसी CBT-1 पॅटर्न

– एकूण 100 गुणांसाठी 100 प्रश्न.

– गणित, सामान्य बुद्धिमत्ता आणि रिझनिंगचे प्रत्येकी 30 प्रश्न.

– जनरल अवेअरनेसचे 40 प्रश्न.

– परीक्षेचा कालावधी 1 तास 30 मिनिटे आहे.

 

आरआरबी एनटीपीसी CBT-2 पॅटर्न

– 120 प्रश्नांसाठी 120 गुण आणि अडीच तास कालावधी.

– गणित आणि रिझनिंगचे प्रत्येकी 35 प्रश्न.

– सामान्य बुद्धिमत्ता आणि जनरल अवेअरनेसचे प्रत्येकी 50 प्रश्न.

 

आरआरबी एनटीपीसी कॉम्प्युटर बेस्ड अॅप्टिट्युड टेस्ट / टायपिंग टेस्ट

 

असिस्टंट स्टेशन मास्टर आणि ट्रॅफिक असिस्टंट पदासाठी कॉम्प्युटर बेस्ड अॅप्टिट्युड टेस्ट द्यावी लागते. ज्युनिअर अकाउंट्स असिस्टंट कम टायपिस्ट, सिनिअर क्लार्क कम टायपिस्ट आणि सिनिअर टाईम किपर पदासाठी टायपिंग टेस्ट घेतली जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -