मोबाईल वापरण्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय दूरसंचार नियामक(port mobile number) एक नवीन नियम आणलाय. हा नियम १ जुलै २०२४ पासून लागू होणार आहे. फसवणुकीच्या वेगाने वाढणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय. हा भारतात सिम कार्ड वापरणाऱ्यांसाठी आहे.
नवीन नियमानुसार,मोबाईल युझर्स सिम स्वॅप(port mobile number) केल्यानंतर वापरकर्ते त्यांचा मोबाइल नंबर पोर्ट करू शकणार नाहीत. ते त्यांचा नंबर इतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीकडे स्विच करू शकणार नाहीत. हा नियम सिम वापरकर्त्यांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यात मदत करेल.
सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये स्कॅमर युझर्सची फसवणूक करण्यासाठी वारंवार सिम स्वॅपिंगचा वापर करतात. सिम स्वॅपिंगनंतर वापरकर्त्यांचे सर्व कॉल, संदेश आणि OTP इतर फोनवर मिळू लागतात. यामुळे त्यांची फसवणूक होऊ शकते. वापरकर्त्यांनी या नियमाचे पालन करण्यासाठी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि तुमचे सिम कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत जबाबदारीने पावले उचलली पाहिजेत.