राज्यात एकीकडे दुसरी लाट ओसरत असताना राज्यात शाळा नेमका कधी सुरू होणार? शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्सने राज्य सरकारला नेमक्या काय सूचना केल्या आहेत? याबाबत चाइल्ड टास्क फोर्स सदस्य समीर दलवाई यांच्याकडून ‘एबीपी माझा’ने जाणून घेतलं. ‘शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत जर तयारी पूर्ण झाली, तर शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक असल्याच डॉ. दलवाई यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे. लहान मुलांचे लसीकरण जरी ऑक्टोबरपासून सुरू होत असले तरी लसीकरण सुरू होण्याचा आणि शाळा सुरू करण्याचा कोणताही संबंध नसल्याचं डॉ. दलवाई यांनी सांगितले.
शाळा सुरू करण्याबाबत, लहान मुलांच्या लसीकरण, डेल्टा प्लसचा मुलांना कितपत धोका आहे? अशा विविध मुद्यावर डॉ समीर दलवाई यांनी काय म्हटलं पाहूया.
टास्क फोर्सच्या मते राज्यात शाळा नेमक्या कधी सुरू व्हायला हव्यात?
मुलांना संसर्ग होऊन त्यांना त्रास होऊ नये याचा विचार करून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जातोय. शाळेत मास्क घालणे, सोशल डिस्टसिंग पालन करणे, शाळेत गर्दी होऊ नये यसाठी नियोजन करणे हे गरजेचं आहे. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व अॅडल्ट आहेत त्यामुळे त्यांचे लसीकरण होणं किमान गरजेचा आहे. मुलांना कोविड झाला तर तो सौम्य असतो, प्रौढांना जर त्याचा संसर्ग झाला तो गंभीर स्वरूपाचा असतो. त्यामुळे प्रौढांचा लसीकरण व्हायला हवा
शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स ने नेमक्या शिक्षण विभागाला काय सूचना केल्यात?
शाळा सुरू करण्यापूर्वी सुद्धा काही मुले ऑनलाईन काही मुले ऑफलाईन असे हायब्रीड मॉडेलचा अवलंब करावा लागणारआहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करताना लहान मुलांच्या मानसिकतेचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे. कारण दीड वर्ष लहान मुलं ही घरात होती. शाळा जरी सुरू करण्यात येतील तेव्हा सुरुवातीच्या काळात अभ्यास एका अभ्यास न करता विद्यार्थ्यांचा सोशल रिहॅबिलिटेशन करणे गरजेचे आहे. मुलांना कुठलाही प्रकारची धोका नसणार अशा प्रकारची तयारी करूनच, शाळा सुरू करावे लागणार. शाळा सुरू करताना शिफ्टनुसार मुलांना शाळेत बोलवावे लागेल.
शाळा सुरू करणे आणि लहान मुलांचे लसीकरण याचा सबंध जोडता येईल का?
शाळा सुरू करण्याचा आणि लसीकरण सुरू होण्याचा कसलाच संबंध जोडता येणार नाही. हे दोन पूर्णपणे वेगळे मुद्दे आहेत. लशींचे आत्ताच क्लिनिकल ट्रायल झालेले आहेत, त्यानंतर आता हे लसीकरण सुरू करतोय. कारण लहान मुलांनी लस घेतली की लगेच ती इम्युन होतील, असा त्याचा अर्थ काढू शकत नाही. लसीकरण हे लाँग टर्मसाठी महत्त्वाचा आहे.
डेल्टा प्लसचा धोका लहान मुलांच्या बाबतीत कितपत पाहायला मिळू शकतो?
डेल्टा प्लसचा धोका जेवढा इतरांना आहे तेवढाच मुलांना आहे. मात्र त्यांच्या तुलनेत मुलांना धोका तसा कमी आहे. ज्यांनी आतापर्यंत लस घेतली नाही किंवा जे इम्यून नाहीत ज्यांना आतापर्यंत इन्फेक्शन झालं नाही. त्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. अनेक लहान मुलांना इन्फेक्शन झालेला आहे हे कळत सुद्धा नाही. काही मुलांना सौम्य इन्फेक्शन जाणवतं. तर अगदी कमी टक्का आहे ज्या मुलांना गंभीर इन्फेक्शनला सामोरे जावं लागतं
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत तयारी पूर्ण झाल्यास, शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक….
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -