Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रभारताला सेमी कंडक्टर हब बनवण्यासाठी टाटा ग्रुपचा बड्या अमेरिकन कंपनीशी करार…14 अब्ज...

भारताला सेमी कंडक्टर हब बनवण्यासाठी टाटा ग्रुपचा बड्या अमेरिकन कंपनीशी करार…14 अब्ज डॉलरची गुंतवणूक

भारतात सेमी कंडक्टरची निर्मिती आतापर्यंत होत नव्हती. परंतु आता मोदी सरकारने देशाला सेमी कंडक्टर हब तयार करण्याकडे पावले उचलली आहे. त्यामुळे देशातील अनेक बड्या कंपन्यांसोबत विदेशातील कंपन्या सेमी कंडक्टर क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. देशातील सर्वात जुना आणि मोठा ग्रुप असलेला टाटा उद्योग समूह सेमी कंडक्टर क्षेत्रात उतरला आहे. टाटा ग्रुपसोबत नॅस्डॅकमध्ये लिस्टेड असलेली अमेरिकेतील प्रमुख चिप निर्माता कंपनी एनालॉग डिवाइसेजने (ADI) टाटा ग्रुपसोबत करार केला आहे. यासंदर्भातील माहिती टाटा ग्रुपने दिली आहे.

 

करारमागे काय उद्देश

एनालॉग डिवाइसेजने दिलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, टाटा मोटर्स आणि तेजस नेटवर्क्सने एडीआय सोबत करार केला आहे. धोरणात्मक आणि व्यावसायिक सहकार्य वाढवणे, भारतातील सेमीकंडक्टर उत्पादनाच्या संधी शोधणे आणि एडीआयच्या उत्पादनांचा इलेक्ट्रिक वाहने आणि नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर सारख्या टाटा ऍप्लिकेशन्समध्ये वापर करणे हे आहे, हे उद्देश या करारामागे आहेत.

 

4 अब्ज डॉलरची गुंतवणूक

टाटाकडून गुजरात राज्यात भारतातील पहिला सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारला जात आहे. तसेच आसाममध्ये चिप-असेंबली आणि चाचणी प्रकल्प उभारण्यासाठी एकूण 14 अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहे. टाटा समूहाच्या सेमीकंडक्टर प्लांटच्या बांधकामाला या वर्षाच्या सुरुवातीला भारत सरकारने हिरवा सिग्नल दिला होता.

 

टाटा ग्रुपचे स्पष्टीकरण

एडीआय कराराबाबत बोलताना टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले, टाटा समूह भारतातील समृद्ध सेमीकंडक्टर उद्योग विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहे. सेमीकंडक्टर व्हॅल्यू चेनमध्ये एडीआयसोबत भागीदारी करण्यात आली आहे. एडीआयसोबत झालेल्या कराराअंतर्गत, टाटा समूहाचे ऑटोमॅन्युफॅक्चरिंग युनिट टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आणि तेजस नेटवर्क्सच्या टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एडीआय उत्पादनांचा वापर करणार आहे.

 

एडीआयचे सीईओ आणि चेअरमन व्हिन्सेंट रोश म्हणाले की, भारताच्या सेमीकंडक्टर इकोसिस्टमला पुढे नेण्यासाठी टाटा समूहासोबत एकत्र काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. हा संयुक्त प्रयत्न दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरणार आहे. आम्ही इलेक्ट्रिक वाहनांपासून पुढच्या पिढीच्या नेटवर्क पायाभूत सुविधांपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास वेगाने करू शकतो. आम्ही केवळ सेमीकंडक्टर इकोसिस्टम तयार करत नाही तर जगातिक इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला आकार देत आहोत.

 

महाराष्ट्रात अदानी समूह आणि इस्रायलचे टॉवर सेमीकंडक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून सेमी कंडक्टर चिप प्रकल्प सुरु होणार आहे. तसेच पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रमुख कंपनी लार्सन अँड टुब्रो देखील सेमीकंडक्टर युनिट सुरु करण्याच्या तयारीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -