ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोरोनाच्या तिसर्या लाटेची ओहोटी सुरू झाल्याने गेल्या काही दिवसांत पुन्हा चित्रपटांच्या रीलिज डेट निश्चित होऊ लागल्या आहेत. त्यामुळे मार्च आणि एप्रिलमध्ये चित्रपटांची एकच भाऊगर्दी असणार आहे.
अनेक चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्करही होणार आहे. टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया यांच्या ‘हीरोपंती – 2’ चित्रपटाचीही नवी रीलिज डेट जाहीर झाली आहे. हा चित्रपट 29 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. तारा सुतारिया यात बोल्ड अवतारात आहे. हा चित्रपट अहमद खान यांनी दिग्दर्शित केला आहे. अहमद-टायगर या जोडीने यापूर्वी ‘बागी 2’मध्ये एकत्र काम केले होते.