ताजी बातमी ऑनलाइन टीम
सांगली येथील पंचशीलनगर परिसरात झोपडपट्टीत आग लागल्यामुळे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे ४ घरे जळून खाक झाली. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग विझवत असताना चौघे भाजले असून त्यातील रामचंद्र शिवाजी चव्हाण यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की , येथील पंचशील नगर परिसरात पत्र्याची झोपडपट्टी आहे आहे त्या ठिकाणी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास बंद असलेल्या एका घरात आग लागली. आगीचा प्रकार समजल्यानंतर शेजाऱ्यांनी ही माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलास दिली अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
आग विजवत असतानाच एका सिलेंडरचा स्फोट झाला त्याचा जोरदार आवाज झाला त्याचे तुकडे शेजारील दोन घरांवर उडाले. अग्निशमन दलाचे चार कर्मचारीही यामध्ये जखमी झाले आहेत. त्यातील चव्हाण हे २५ टक्के भाजले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर तिघे किरकोळ जखमी आहेत. आग लागलेल्या घरामध्ये सहा सिलेंडरच्या टाक्या होत्या. या टाक्या तीन टक्के भरलेल्या होत्या अग्निशामक च्या कर्मचाऱ्यांनी या टाक्या जीव धोक्यात घालून तातडीने बाहेर काढल्यामुळे त्याचा स्फोट झाला नाही.
सांगली : गॅसचा स्फोटात, चार घरे जळून खाक, लाखोचे नुकसान
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -